शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर नियामक मंडळाची स्थापना

By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST

आज अधिकृत घोषणा : विक्रमसिंह घाटगे, राजू शेट्टींसह १२ जणांचा समावेश

कोल्हापूर : ऊसदर ठरविण्यासाठी सहकार खात्याने आज, शुक्रवारी ऊसदर नियामक मंडळाची स्थापना केली. अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असून उद्या, शनिवारी याची अधिकृत घोेषणा होण्याची शक्यता आहे. नियामक मंडळात विक्रमसिंह घाटगे, खासदार राजू शेट्टी यांच्यासह बाराजणांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. दरवर्षी उसाच्या दरासाठी होणाऱ्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने गेल्यावर्षी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ऊसदर नियामक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. या मंडळात कोणाची वर्णी लावायची हेही ठरले होते; पण त्याला मूर्त स्वरूप आले नाही. त्यामुळे यावर्षीही ऊसदराची कोंडी होणार असे वाटत होते; पण भाजप सरकारने सत्तेवर येताच तातडीने नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागाने आज बाराजणांचे नियामक मंडळ तयार केले. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, तीन सहकारी साखर कारखान्यांचे, दोन खासगी साखर कारखान्यांचे व दोन इतर असे बारा जणांचे मंडळ तयार केले असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यावर स्वाक्षरी होणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)ऊसदराची कोंडी फुटणार!ऊस दर नियामक मंडळाची स्थापना झाल्यानंतर येत्या आठ दिवसांत सदस्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे ऊसदराची कोंडी लवकर फुटण्यास मदत होणार आहे. रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. बारा जणांच्या या मंडळात सर्वच घटकांना संधी दिली आहे. या मंडळाची पहिली बैठक आठवड्यात होऊन ऊस दराची कोंडी फोडली जाईल. - चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्रीनियामक मंडळाची स्थापना स्वागतार्ह आहे. नुसती स्थापना करून चालणार नसून, कारखानदारीवर मंडळाचा अंकुश हवा. मंडळाने सुचविलेला दर न देणाऱ्या कारखानदारांना दोन वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीचा समावेश यामध्ये हवा. यासाठी प्रयत्नशील राहू. - राजू शेट्टी, खासदार संजय पाटील मुख्यमंत्र्यांना भेटलेविक्रमसिंह घाटगे (संस्थापक, ‘शाहू’ कागल) खासदार विजयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष, राज्य साखर संघ) जयप्रकाश दांडेगावकर (माजी सहकार राज्यमंत्री) बी. बी. ठोंबरे श्री. दिवेकर (पूर्ती शुगर्स) खासदार राजू शेट्टी रघुनाथदादा पाटील --पृथ्वीराज जाचकराज्याचे मुख्य सचिव या नियामक मंडळाचे अध्यक्ष असतील.