शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उत्पन्न आयोग गठित करून उत्पन्नाची हमी द्या!

By admin | Updated: September 15, 2016 02:03 IST

किसान एकता; अकोल्यातील राष्ट्रीय अधिवेशनात निर्णयाची शर्मा यांनी दिली माहिती.

अकोला, दि. १४ - देशभरातील शेतकरी त्यांचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राज्य स्तरावरील संघटनांच्या माध्यमातून संबंधित शासनाच्या विरोधात आवाज उठवत असतात. या सर्व संघटनांना एकत्र करून शेतकर्‍यांचा आवाज व ताकद बुलंद करण्याच्या दृष्टीनेच किसान एकता हा मंच तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून देशभरातील शेतकर्‍यांच्या ६0 संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन अकोल्यात पार पडले असून, यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसह तेलबिया, डाळी यांच्यावरील आयात कर वाढविण्याची मागणी करतानाच सरकारी कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरमहा वेतन दिले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांसाठीसुद्धा शेतकरी उत्पन्न आयोग गठित करून त्याुनसार शेतकर्‍यांना शेतमजूर व मासेमारी करणार्‍या मजुरांना दरमहा उत्पन्नाची हमी देण्यात यावी, अशी मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे, अशी माहिती किसान एकताच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार व शेती प्रश्नाचे अभ्यासक देवेंद्र शर्मा यांनी दिली. जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधीया, प्रकाश पोहरे, भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस ओंकारसिंग, दक्षिण भारतीय ऊस उत्पादक महासंघ तामिळनाडूचे अध्यक्ष राजकुमार, मध्य प्रदेशचे केदार सिरोही, केरळचे ङ्म्रीधर, माजी आमदार वसंतराव गोडे आदी उपस्थित होते. शर्मा यांनी किसान एकताच्या निर्मितीचा आढावा घेत चंदीगड, शिमला या अधिवशेनानंतर अकोल्यात झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा वृत्तांत दिला. देशभरात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणार्‍या ६५ संघटना व पक्ष असून, या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून, यावेळी तब्बल ६0 संघटनांच्या प्रतिनिधींनी अधिवेशनात भाग घेतला आहे. ही ताकद येणार्‍या काळात शेतकर्‍यांचा आवाज राष्ट्रीय स्तरावर बुलंद करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या अधिवेशनात स्वामीनाथन आयोगाने केलेल्या उत्पादन खर्चाव्यतिरिक्त ५0 टक्के नफा शेतकर्‍यांना मिळावा व सरकारने दिलेल्या शब्दाला जागावे, अशी मागणी केली आहे. जमीन अधिग्रहण कायदा हा शेतकर्‍यांच्या मुळावर आला असून, या कायद्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे साधन असलेली जमीन हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी थांबविण्याचीही मागणी त्यांनी केली.मोहरीमध्ये जीएम तंत्रज्ञानाला मान्यता नको!केंद्र सरकार मोहरीच्या वाणामध्ये जीएम तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रस्तावाला मान्यता देण्यात येऊ नये, तसेच देशात दर्जेदार तेलबियांचे उत्पादन होऊन शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, अशी व्यवस्था निर्माण केली तर पिवळी क्रांती होऊन देश पुन्हा एकदा खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होईल, अशी मागणी करण्यात आली.