शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांसाठी ‘अत्यावश्यक सेवा कायदा’

By admin | Updated: June 1, 2015 02:23 IST

५ जूनपर्यंत सूचना सादर करा; शासनाचे निर्देश.

अकोला- जन्म-मृत्यूचा दाखला, विवाह नोंदणी असो वा बांधकामाचा नकाशा यासह विविध कामकाजासाठी मनपा तसेच नगर पालिकेत पायपीट करणार्‍या नागरिकांना अधिकारी-कर्मचार्‍यांकडून होणार्‍या टोलवाटोलवीचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या समस्यांचा प्रशासकीय पातळीवर त्वरित निपटारा करण्यासाठी शासनाने राज्यातील महापालिका आणि नगर पालिकांमध्ये ह्यअत्यावश्यक सेवा कायदाह्ण लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात कालावधी निश्‍चित करण्यासाठी येत्या ५ जूनपर्यंंत सूचना सादर करण्याचे निर्देश शासनाने मनपा व नगर पालिका प्रशासनाला शुक्रवारी दिले. नागरिकांना विविध कामकाजासाठी दररोज स्वायत्त संस्थांचे उंबरठे झिजवावे लागतात. जन्म-मृत्यू, विवाह नोंदणीचा दाखला, बांधकाम नकाशासाठी लागणारी मंजुरी, नळ कनेक्शन, मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया आदींसह विविध कामांसाठी महापालिका व नगर पालिकांमध्ये अर्जांंचा ढीग साचतो. अपुरी कर्मचारी संख्या, अधिकार्‍यांची वेळीअवेळी होणार्‍या उपस्थितीमुळे नागरिकांची बोळवण केली जाते. यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांच्या विरोधातही तक्रारींचा खच वाढतो. या सर्व बाबी लक्षात घेता, प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी, विविध कामांचा निपटारा करण्यासाठी एक ठरावीक कालावधी निश्‍चित करण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला. शुक्रवारी मनपा आयुक्तांसह नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राज्यात ह्यअत्यावश्यक सेवा कायदाह्ण लागू करण्यावर विचार मंथन करण्यात आले. या कायद्यांतर्गत विविध प्रकारच्या ११ सेवांचा अंतर्भाव करण्यावर चर्चा झाली. शिवाय यामध्ये आणखी काही बदल किंवा सूचना करण्यासाठी ५ जूनपर्यंंत सूचनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश नगर विकास विभागाच्या सहसचिवांनी दिले. बैठकीला आयुक्त सोमनाथ शेटे उपस्थित होते.