पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:22 AM2020-05-05T00:22:48+5:302020-05-05T00:59:48+5:30

मुलांना त्यांनी लिहिलेला निबंध, स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांचे नाव, इयत्ता, गाव, तालुका आणि जिल्हा लिहून +1 437-971-1737 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे.

essay writing competition for the students in the lockdown situation from the Canada sna | पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा; लॉकडाऊनमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जग लॉकडाउन आहेविद्यार्थ्यांसाठी कॅनडातून विबंध स्पर्धेचं आयोजनकॅनडामध्ये राहणारे दिपक बिडवई यांनी केले आहे या निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जग लॉकडाउन आहे. सर्वजण घरात अडकून पडले आहे. शाळांना सुट्टी असल्याने मुलांनाही घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. एरवी मित्र आणि मैत्रिणींमध्ये धमाल करणाऱ्या मुलांना आता चार भिंतींच्या आतच खेळ खेळावे लागत आहेत.  सारखा तोच तो अभ्यास अथवा तेच ते खेळ खेळून तेही कंटाळले आहेत. मात्र, अशी स्थिती असताना, या मुलांच्या विचारांना चालना देण्याच्या उद्देशाने कॅनडामध्ये राहणारे दिपक बिडवई यांनी 'बिडवई गुरूजी निबंध स्पर्धे'चे आयोजन केले आहे.

निबंधाचा विषय -

"कोरोना व्हायरसमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मित्र-मैत्रिणी भेटत नाहीत, संचारबंदीमुळे घरात बसून राहावं लागतं, बाहेर खेळायला जाता येत नाही. ह्या संचारबंदीच्या काळात तुम्हाला आलेले अनुभव, मित्र-मैत्रिणींची येणारी आठवण, मैदानी खेळ... तसेच, सभोवताली ज्या घडामोडी घडत आहेत, याचे जगावर, तुमच्यावर काय परिणाम होत आहेत किंवा होतील? तसेच इतरांच्या अडचणी, दुःख." हे निबंधाचे विषय आहेत. या विषयांवर, कमाल ५०० शब्दांत आपल्या भावना लिहून पाठवायच्या आहेत. 

असे आहे बक्षिसांचे स्वरूप -

मुलांना त्यांनी लिहिलेला निबंध, स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांचे नाव, इयत्ता, गाव, तालुका आणि जिल्हा लिहून +1 437-971-1737 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे. प्रथम पारितोषिक 1 हजार रुपये द्वितीय पारितोषिक 500 रुपये तर तृतीय पारितोषिक 300 रुपये, असे बक्षिसांचे स्वरूप आहे. 10 मे 2020 ही निबंध पाठवण्याची शेवटची तारीख आहे. 

Web Title: essay writing competition for the students in the lockdown situation from the Canada sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.