मुंबई-पुण्याचे अभियंते इराकमध्ये अडकले

By Admin | Updated: June 20, 2014 03:22 IST2014-06-20T03:22:44+5:302014-06-20T03:22:44+5:30

मुंबई-पुण्यातील सात अभियंते अडकले आहेत. सहा मुंबईचे तर एक पुण्याचा रहिवासी असून, सर्व पुण्यातील आयटी इन्फ्रा प्रा.लि. (बाणोर) या कंपनीचे अधिकारी आहेत. सर्व जण सुरक्षित आहेत.

Engineers of Pune-Pune city were stuck in Iraq | मुंबई-पुण्याचे अभियंते इराकमध्ये अडकले

मुंबई-पुण्याचे अभियंते इराकमध्ये अडकले

>राजेश निस्ताने - मुंबई/यवतमाळ
इराकमधील दहशतवादी हल्ल्यात मुंबई-पुण्यातील सात अभियंते अडकले आहेत. सहा मुंबईचे तर एक पुण्याचा रहिवासी असून, सर्व पुण्यातील आयटी इन्फ्रा प्रा.लि. (बाणोर) या कंपनीचे अधिकारी आहेत. सर्व जण सुरक्षित आहेत. 
इराक सोडण्यासाठी एक्ङिाट व्हिसाची आवश्यकता आहे. इराक प्रशासनाकडून हा व्हिसा दिला जाणार आहे. 2क्क् भारतीय नागरिक इराकमध्ये अडकून पडले असून, त्यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. ‘आयटी इन्फ्रा’ने इराकमधील करबला येथे अलकाफिला हॉस्पिटलच्या बांधकामाचे कंत्रट घेतले आहे. दफीर अल-बल्डवाई यांच्याकडून पुण्यातील या कंपनीला हे कंत्रट मिळाले आहे. त्यासाठी कंपनीने पथक इराकमध्ये पाठवले. या सातही जणांना परत बोलविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. सुरक्षेच्या कारणावरून या सातही जणांच्या नावाबाबत गुप्तता पाळली जात आहे. 
 
आयटी इन्फ्रा प्रा.लि. बाणोरचे संचालक नीलेश ठाकरे यांनी सांगितले, की आमचे सात अभियंते इराकमध्ये अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्र शासन आणि संरक्षण मंत्रलयाशी संपर्क सुरू आहे. 

Web Title: Engineers of Pune-Pune city were stuck in Iraq