शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अफू लागवड करणा-या २५ शेतकऱ्यांना सक्तमजुरी

By admin | Updated: April 8, 2015 01:35 IST

परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकऱ्यांना दोषी ठरवत सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अंबाजोगाईतील

अंबाजोगाई (जि़ बीड) : परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकऱ्यांना दोषी ठरवत सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अंबाजोगाईतील तिसरे अपर व सत्र न्या. एन.एस. कोल्हे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर १३ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्त केले़ २०१२ मध्ये अफू शेतीचे प्रकरण उघडकीस आले होते. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात अडकलेले शेतकरी अनेक दिवस तुरुंगात होते. अफूप्रकरणी एकाच वेळी इतक्या शेतकऱ्यांना शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे.शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये सुरेश शेप, पांडुरंग शेप, संभाजी शिंदे, बालासाहेब शिंदे, आत्माराम शेप, उद्धव मोरे, मधुकर शेप, भास्कर शेप, उद्धव देशमुख, सदाशिव थावरे, ज्ञानोबा मोरे, नवनाथ थावरे, भीमराव शिंदे, विष्णू शिंदे, शेख पाशु शेख महेबुब, भीमराव राठोड, दिना राठोड, लाला निंबाळकर, भगवान शिंदे, बिभिषण शेप, हरिभाऊ कोकाटे, सुरेश नेमा राठोड, शिवाजी राठोड, चंद्रसेन थावरे, बापू थावरे यांचा समावेश आहे़ परळी तालुक्यातील मोहा, वंजारवाडी, घोलपतांडा येथे ३९ शेतकऱ्यांनी २६ एकर दोन गुंठे शेतजमिनीत बेकायदेशीरपणे अफुची लागवड केली होती. हा प्रकार सिरसाळा पोलिसांना माहित झाल्याने २४ फेब्रुवारी २०१२ रोजी पोलिसांनी कारवाई करून २७ हजार ७७० किलोग्रॅम अफुचे ओले पीक जप्त केले. याची किंमत एक कोटी ३६ लाख रुपये होती.सिरसाळाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक लक्ष्मण विठ्ठल मंकावार यांच्या फिर्यादीवरून ३९ शेतकऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंद झाला. पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने २५ जणांना दोषी ठरवले. यातील कायम फरार राहिलेला व्यापारी सुकविंदरसिंह दर्शनसिंग धिल्लो या घटनेपासून आजतागायत फरार आहे. (वार्ताहर)