शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सेंट्रल आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: May 5, 2015 01:51 IST

सध्या एसटीचा गर्दीचा काळ सुरू झाला असून, या काळात एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाजवळील आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे

मुंंबई : सध्या एसटीचा गर्दीचा काळ सुरू झाला असून, या काळात एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाजवळील आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई सेंट्रल आगारात वाहतूक निरीक्षकांच्या जागा रिक्त असून, आगार प्रमुखांकडूनच वाहतुकीचा गाडा पुढे हाकलण्यात येत आहे. एसटीचा राज्यात मोठ्या प्रमाणात पसारा असून, वर्षाला जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन करताना त्यांचा प्रवास व्यवस्थित होण्यासाठी राज्यात सव्वा लाख एसटीचे कर्मचारी आहेत. सध्या चालकांवर पडणारा कामाचा ताण पाहता महामंडळाकडून कनिष्ठ चालकांची भरतीही केली जात आहे. मात्र असे असले तरी एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांची कुठे ना कुठेतरी कमतरता भासत आहे. गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडल्या जातात आणि या वेळी नियोजन करताना राज्यातील आगार प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांची धांदल उडत असते. काही वेळेला तर कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही आगार आणि एसटी स्थानकातील कर्मचारी अपुऱ्या मनुष्यबळातच काम करीत असतात. मात्र याकडे एसटी महामंडळाचे लक्षही जात नाही. हीच परिस्थिती मुंबई सेंट्रल आगारातील असून, बाजूला मुख्यालय असूनही अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष न जाणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या मुंबई सेंट्रल आगारात तीन वाहतूक निरीक्षक पदाच्या रिक्त जागा आहेत. या आगारात एक आगारप्रमुख आणि साहाय्यक आगारप्रमुख असून त्यांच्याकडूनच वाहतुकीचे नियोजन केले जाते. या आगारासाठी वाहतूक निरीक्षकाच्या जागा मंजूर असूनही गेल्या काही महिन्यांपासून त्या भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई सेंट्रल आगारात वाहतुकीचे नियोजन करताना बराच गोंधळ उडत आहे. गर्दीच्या काळात सध्या नियमित बसेस सोडण्याबरोबरच ६८६ जादा बसेसही महामंडळाकडून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक १७७ आणि त्यानंतर मुंबईतून १७0 जादा बसेस सोडण्यात आल्या असून, उर्वरित जादा बसेस औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागातून सोडण्यात आल्या आहेत. मुख्यालयाजवळील आगाराची ही परिस्थिती असतानाही त्याकडे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष न जाणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे.