शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या धर्तीवर राज्यात आपतकालीन बचाव दल

By admin | Updated: July 31, 2014 14:19 IST

माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने केंद्रातील एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपतकालीन बचाव दलाची (एसडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३१ - माळीण येथील भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने केंद्रातील एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपतकालीन बचाव दलाची (एसडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात सुमारे ४०० ते ५०० जवानांचा समावेश केला जाणार असून राज्यात माळीणसारखी दुर्घटना घडल्यावर एसडीआरएफचे पथक तात्काळ मदतीसाठी रवाना होऊ शकणार आहे. 
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात बुधवारी सकाळी डोंगराचा कडा कोसळला व संपूर्ण गावच नकाशावरुन नष्ट झाले. या दुर्घटनेला आता २४ तासांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप बचावकार्य सुरु आहे. पाऊस आणि मातीचा ढिगा-यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा ३० पर्यंत पोहोचला असून आणखी १५० जण ढिगा-याखाली अडकले असावे अशी शक्यता आहे. राष्ट्रीय आपतकालीन बचाव दलाचे (एनडीआरएफ) ३०० या मदतकार्यात अथक मेहनत घेत आहेत. यापार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने केंद्राच्या धर्तीवर राज्य आपतकालीन बचाव दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. एसडीआरएफमध्ये ४०० ते ५०० जवानांचा समावेश केला जाईल. या जवानांना बचावकार्यातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल असे सांगितले जाते. मात्र एसडीआरएफच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा, जवानांची भरती कशी केली जाईल, त्यासाठीचा निधी किती लागणार हे अद्याप समजू शकलेले नाही. 
एसडीआरएफची स्थापना झाल्यास एनडीआरएफचे जवान येईपर्यंत वाट न बघता तातडीने मदतकार्याला सुरुवात करणे शक्य होईल. 
 
माळीण गावाकडे मदतीचा ओघ सुरू
केंद्रीय गृहमंत्रीी राजनाथ सिंह यांनी आज माळीण गावाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारतर्फे २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातर्फेही माळीण गावच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.