शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

एल्गार परिषदः "शरद पवारांनी 'ती' कागदपत्रं उघड करून मोदी सरकारचा पर्दाफाश करावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:32 PM

एल्गार परिषदेच्या तपासावर शंका उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना डॉ. प्रकाश आंबेडकरांची विनंती....

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासाबाबत शंका उपस्थित केली होती. हे तपास प्रकरण बनावट असून त्याविषयीचे  पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पवार यांनी लिहिले होते. तसेच एसआयटीमार्फत एल्गार प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. मात्र त्याचवेळी केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले. आता पवारांनी त्यांच्याकडील महत्वाची कागदपत्रे सार्वजनिक करून केंद्र सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी विनंती वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता गेली व महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हे सर्व तपास प्रकरण बनावट असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या पत्रात एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आता प्रकाश आंबेडकर यांनी पवारांना एल्गार परिषदेसंबंधी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची विनंती केली आहे. शरद पवार ही विनंती मान्य करतील अशी अपेक्षा देखील आंबेेेडकरांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे. तसेच एल्गार परिषदेवरून केंद्र सरकार राजकारण असून या प्रकरणाचा तपास देखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित व्यक्तींवर नको असलेले कायदे लावण्यात आले आहे. मात्र  या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारElgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे