शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी

By admin | Updated: July 28, 2014 04:02 IST

परराज्यांना जोडणाऱ्या सीमांच्या ठिकाणी कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके राज्य शासन सुरू करणार आहे

क-हाड : परराज्यांना जोडणाऱ्या सीमांच्या ठिकाणी कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके राज्य शासन सुरू करणार आहे. त्यापैकी १३ नाक्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कऱ्हाड येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कर व महसूल चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले आहे. या धोरणानुसार परराज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभे करण्यात येणार आहेत. तसेच क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही हे तपासणी नाके लक्ष ठेवतील. विविध मार्गांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारा इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभाग सुरू करणार आहे. कायद्याने या विभागाला मान्यता नाही. मात्र, अपघातांसह त्यामध्ये ठार किंवा जखमी होणारे लोक यांचेही प्रमाण अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी कायद्यात बदल करून इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभागाला मान्यता देईल, असे सांगून ते म्हणाले, यासाठी एखादी खासगी संस्था पुढे आल्यास त्यांनाही प्राधान्य देण्याचा राज्य शासन विचार करील. प्रशासन गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडतील. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश करणार आहे. तसेच इतर विभागांप्रमाणेच परिवहन विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागामार्फत लोकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले. नारायण राणेंनी मंत्रिपदाबरोबर प्रदेशाध्यक्षपद मागितले आहे, याबाबत विचारताच, हा निर्णय माझ्या हातात नाही, एवढेच उत्तर त्यांनी दिले. (प्रतिनिधी)