कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दिवसा 8 व रात्री 10 तास वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:16 IST2017-12-08T18:14:27+5:302017-12-08T18:16:08+5:30

सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रात्री 10 तास व दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने पूर्ववत 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Electricity supply to the farming customers 8 hours a day and 10 hours at night | कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दिवसा 8 व रात्री 10 तास वीजपुरवठा

कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दिवसा 8 व रात्री 10 तास वीजपुरवठा

मुंबई : सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रात्री 10 तास व दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने पूर्ववत 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ऑक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे देशात कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली होती.  परिणामी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळात बदल करून रात्री 8 तास व दिवसा 8 तास अशा पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येत होता. 
शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी व वीजप्रणालीच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने विभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून त्याची अंमलबजावणी 5 ऑक्टोबरपासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार कृषिभाराचे योग्य नियोजन करून कृषिपंपाच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर 2017 ते फेब्रुबारी 2018 या मासिक कालावधीत या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी सूरू राहणार आहे.

Web Title: Electricity supply to the farming customers 8 hours a day and 10 hours at night