शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना मिळणार पोल्स, केबल्सचा परतावा ; शेतकºयांना मात्र वगळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:33 IST

वीज कायदा २००३ नुसार मागेल त्याला मुदतीत वीज देणे व त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे.

ठळक मुद्दे ग्राहक संघटनांकडून दुजाभावाबद्दल नाराजी ८ सप्टेंबर २००६ रोजी ‘ दर आकारांची अनुसूची’ केली मंजूर २.५ लाख ग्राहकांना शासनाच्या खर्चाने उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत जोडण्या दिल्या जाणार

पुणे : महावितरणकडे नवीन वीज जोडणी घेणाऱ्या कोणत्याही वर्गवारीतील लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांना विद्युत खांब, विद्युत वाहिनी यांसारख्या पायाभूत सुविधांवर केलेल्या खर्चाचा परतावा पाच समान हप्त्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना सुविधेतून वगळल्याने ग्राहक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वीज कायदा २००३ नुसार मागेल त्याला मुदतीत वीज देणे व त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे. म्हणजेच विद्युत वाहिनीसाठी विद्युत वाहिनीचे खांब व लाईन उभारणी करणे ही जबाबदारी देखील महावितरणचीच आहे. त्यानुसार आयोगाने २० जानेवारी २००५ रोजी विद्युत पुरवठा संहिता विनियम लागू केला. तसेच, ८ सप्टेंबर २००६ रोजी ‘ दर आकारांची अनुसूची’ मंजूर केली. त्यानुसार पायाभूत सुविधांसाठी होणारा खर्च ग्राहकांकडून न घेता त्याचा समावेश वार्षिक महसूली गरजेत करावा असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यानंतरही डेडिकेटेड डिस्ट्रिब्युशन फॉसिलिटी (डीडीएफ) या नावाचा गैरवापर करून हजारो ग्राहकांवर पायाभूत सुविधांचा खर्च लादण्यात आला.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने या विरोधात आयोगासमोर याचिका दाखल केल्यानंतर आयोगाने संबंधित ग्राहकांना परतावा देण्याचे आदेश मे २००७ मध्ये दिले. या संदर्भातील कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१६ मध्ये अंतिम आदेश दिले आणि वीजग्राहक संघटनेची मागणी आणि आयोगाचे आदेश वैध ठरविले. त्यानंतर पूर्वीच्या ग्राहकांना कांही प्रमाणात परतावा देण्यात आलेला आहे. अद्यापही अनेकांना परतावा मिळालेला नाही. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव प्रताप होगाडे म्हणाले, पैसे भरुनही वीज जोड न मिळालेल्या (पेड पेंडींग) २.५ लाख ग्राहकांना शासनाच्या खर्चाने उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) अंतर्गत जोडण्या दिल्या जाणार आहेत. तथापि पेंडींग (प्रलंबित) व नवीन अर्जदारांना मात्र डीडीएफ अंतर्गत म्हणजेच स्वखर्चाने जोडणी दिली जाणार आहे. याचाच अर्थ प्रलंबित व नवीन शेतीपंप अर्जदारांना ३ हॉर्स पॉवर्स अथवा ५ हॉर्स पॉवर्सच्या जोडणीसाठी अंदाजे अडीच लाख रुपये खर्च करावे लागतील. महावितरणच्या या मागणीस आयोगाने मान्यता दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीGovernmentसरकार