शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

निवडणुकीआधी पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:35 AM

भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला.

मुंबई : भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा कार्यकर्त्यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला. जवानांच्या शौर्यावर संशय नसून सरकारच्या माहितीवरच विश्वास नाही. हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही एअरलिफ्ट करण्याऐवजी जवानांना त्या धोकादायक रस्त्यावरून पाठवले. एअर स्ट्राइकमध्ये १० लोकही मेले नाहीत. जवानांचा हकनाक बळी गेल्यानंतरही कुणी साधा प्रश्नही उपस्थित करायचा नाही का, असा सवाल त्यांनी केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप, दाऊदचे प्रत्यार्पण, राम मंदिर या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरल्याने अशा घटना घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पाकिस्तानचे १० लोक जरी मारले असते, तरी इम्रान खान यांनी कॅप्टन अभिनंदन यांना सोडले नसते. त्यामुळे भाजपाकडून केले जाणारे सर्व दावे साफ खोटे आहेत, असे ते म्हणाले.ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा!सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना ठोकून काढा, असे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. मुद्द्याला मुद्द्याचा विरोध असेल, तर ठीक आहे. मात्र शिव्या देणाºया ट्रोलर्सला पुरावे तपासत घरातून बाहेर काढून ठोकून काढा, असे राज ठाकरे म्हणाले.पंतप्रधान बेफिकीर!देशात युद्धजन्य परिस्थिती असताना पंतप्रधान कोरियामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असतील, तर ते बेफिकीर असल्याची टीकाही राज यांनी केली. पुलवामा हल्ल्यापासून एअर स्ट्राइक होईपर्यंत रोज पंतप्रधानांनी बदललेल्या कपड्यांचे फोटोच राज यांनी जाहीर सभेत दाखवले. जवानांहून व्यापारी अधिक शौर्य दाखवतात, असे पंतप्रधानांचे वक्तव्य असलेला व्हिडीओ दाखवत राज यांनी संताप व्यक्त केला.राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्नराफेलच्या दर्जाबाबत प्रश्न नसून त्याचे काम उद्योगपती अनिल अंबानी यांना का दिले?चीनसोबत वाद सुरू असताना चिनी पदार्थांवर बंदी लादण्याची मागणी करणाºया भाजपा कार्यकर्त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा चीनने तयार केलेला पुतळा कसा चालतो?भारतीयांना मारल्यानंतर पाकच्या सैनिकाला आपण सोडणार नसू, तर ३००हून अधिक लोक मारल्यानंतर पाकने अभिनंदनला का सोडले?

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान