पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:37 IST2026-01-13T19:34:32+5:302026-01-13T19:37:08+5:30
ZP Panchayat Samiti Election 2026: महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागताच राज्यात पुन्हा प्रचाराच्या निमित्ताने राजकारण तापणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि तब्बल १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
Panchayat Samiti Election: महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापालिका निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी जाहीर होणार आहेत, त्याच दिवशीपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक सुरू होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये राजकीय आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलेली नाहीये, अशाच ठिकाणी ही निवडणूक होत आहे.
कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांचा यात समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यासाठी निवडणूक?
सिंधुदुर्ग - ८
रत्नागिरी - ९
रायगड -१५
पुणे - १३
सातारा - ११
सांगली - १०
सोलापूर - ११
कोल्हापूर - १२
छत्रपती संभाजीनगर - ९
परभणी - ९
धाराशिव - ८
लातूर - १०
अर्ज भरण्याची तारीख, मतदान आणि निकाल, पहा निवडणूक कार्यक्रम कसा?
१) नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
२) नामनिर्देशन पत्राची छाननी - २२ जानेवारी २०२६
३) उमेदवारी माघारीची अंतिम मुदत - २७ जानेवारी २०२६ दुपारी ३ पर्यंत
४) अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी २०२६ दुपारी ३.३० नंतर
५) अंतिम उमेदवारांची यादी - २७ जानेवारी २०२६
६) मतदानाचा दिनांक - ५ फेब्रुवारी २०२६ - सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
७) मतमोजणी - ७ फेब्रुवारी २०२६ - सकाळी १० वाजल्यापासून