शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

एकनाथ शिंदे भाजपसोबत! गुवाहाटीतील बैठकीत स्पष्ट संकेत; आतापर्यंत ४३ आमदारांचे मिळाले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 08:07 IST

Eknath Shinde: भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे भाजप-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे.

मुंबई : भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे भाजप-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे.

आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिंदे यांनी गुरुवारी एक व्हिडीओ जारी केला. त्यात आमदारांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले की, जे सुख-दु:ख आहे, ते आपले सगळ्यांचे एकच आहे. काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही म्हणालात तसे ती नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही देशातील ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तुमच्या मागे आमची शक्ती आहे. कुठेही काही लागले तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल. शिंदे यांनी याच व्हिडिओमध्ये बोलताना तो पक्ष महाशक्ती आहे, त्यांनी पाकिस्तानची काय परिस्थिती केली, असे एक अपूर्ण वाक्यही उच्चारले. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भाजपसोबत आपण आहोत असे त्यांना म्हणायचे असावे.

शिंदे यांच्या या व्हिडीओतून ते भाजपविषयी बोलत असल्याचे स्पष्ट होते. देशातील दोन मोठे पक्ष भाजप व काँग्रेस हेच आहेत आणि शिंदे यांनी आधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवली आहे. त्यामुळे पर्याय उरतो तो भाजपचा. शिंदे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दलचे संकेत दिले आहेत. शिवसेनेकडून शिंदे यांचे बंड थोपविण्याचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे शिंदे हे भाजपच्या अधिक जवळ गेल्याचे स्पष्ट झाले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील हॉटेलमध्ये गुरुवारी समर्थक आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समर्थकांना आश्वस्त करताना अप्रत्यक्षपणे या सर्व राजकीय खेळीमागे भारतीय जनता पक्ष असल्याचे सूचित केले. दरम्यान, गुरुवारी दिवसभरातील घडामोडींदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बंडखोरीमागे भाजपच असल्याचा दावा केला. 

आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही म्हणालात तसे ती नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही देशातील ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तुमच्या मागे आमची शक्ती आहे. कुठेही काही लागले तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल. 

अजित पवार यांचा दावा फोल...शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप गेले तीन दिवस होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या आरोपाचा गुरुवारी पुनरुच्चार केला. तथापि, राज्यातील सत्तासंघर्षात सध्या तरी भाजपाच्या कुठलाही मोठा नेता दिसत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रपरिषदेत केले. राज्याबाहेरील घटनांची अजित पवार यांना कल्पना नसावी असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही घटनांचा उल्लेख करत आणि शिंदे यांच्या वक्तव्याचाच आधार घेत या बंडामागे कोण आहे, हे लक्षात येते असा टोला भाजपला हाणला. एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दावा फोल ठरला आहे.

शिवसेना गटनेतेपदी चौधरींची नियुक्ती वैधचnउद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांची शिवसेना गटनेतेपदी केलेली नियुक्ती वैधच आहे, असा निर्वाळा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियमाप्रमाणे पक्षप्रमुखांनी गटनेता निवडायचा असतो. nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता केले होते. आता पक्षप्रमुखांनीच अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्याचे पत्र दिले आहे. सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून सही केली आहे. त्यामुळे अजय चौधरी यांची नियुक्ती वैध आहे, असा निर्वाळा झिरवाळ यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार१) आदित्य ठाकरे २) अजय चौधरी ३) रमेश कोरगावकर ४) उदय सामंत ५) वैभव नाईक ६) रवींद्र वायकर ७) उदयसिंह राजपूत ८) संतोष बांगर ९) भास्कर जाधव १०) सुनील राऊत ११) राजन साळवी १२) दिलीप लांडे १३) नितीन देशमुख १४) कैलास पाटील १५) राहुल पाटील १६) सुनील प्रभू १७) प्रकाश फातर्पेकर १८) संजय पोतनीस.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे नवीन सत्ता समीकरण राज्यात लवकरच बघायला मिळू शकते.     शिंदे हे येत्या एकदोन दिवसात त्यांच्यासमर्थक आमदारांची यादी व पत्र विधानसभा उपाध्यक्षनरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देतील अशी शक्यता आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा