शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 18:17 IST

समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेंनी केलेली आहे.

मुंबईः मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्या या मागणीला इतर मंत्र्यांनाही पाठिंबा दिला असून, लवकरच हा मार्ग 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाणार असल्याचं राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा हा निर्णय होईल आणि ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण होतील. समृद्धी महामार्ग तीन वर्षांच्या आत पूर्ण होईल. 20 ते 22 टक्के काम प्रगतिपथावर आहे. नागपूर- मुंबई हे 15 तासांचं अंतर समृद्धी महामार्गामुळे सहा तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे त्या भागातल्या विकासाला चालना मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सगळ्याच भागाला न्याय मिळणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आणि गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्यातला नाही तर देशातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा एमएसआरडीसीच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहोत. देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं हा महामार्ग गेमचेंजर ठरणार असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची  भाजपाची मागणी आहे. तर भाजपाचे आमदार असलेल्या गणपतराव गायकवाड यांनी समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, अशीही मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेनं बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह धरला आहेत. तशा आशयाचं पत्रच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यावेळी भाजपा व शिवसेनेची युती असल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं पेच निर्माण झाला होता. पण आता मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच असल्यानं समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे