शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: ठाकरेंना धक्का, शिंदेंना मोठा दिलासा! पक्ष चिन्हावर कार्यवाहीस निवडणूक आयोग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 17:07 IST

Eknath Shinde Update News:  प्राथमिक सदस्यत्व असलेले पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पक्ष सोडूनही आयोग शिंदेंना शिवसेनेचा सदस्य मानत आहे. या सर्व प्रक्रियेत १० वी सूची महत्वाची ठरते. मनिंदर सिंग यांच्या युक्तीवादावर सिब्बल यांनी प्रत्यूत्तर दिले होते.

शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात आज चारही बाजुंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. 

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. सकाळपासून शिवसेनेचा ठाकरे गट हा निवडणूक आयोगाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सिब्बल यांनी त्या दिशेनेच युक्तीवाद केला होता. शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच आहेत, निवडणूक चिन्हही त्यांच्याकडेच आहे. यामुळे निवडणूक आयोग आता यावर निर्णय घेणार आहे. 

 प्राथमिक सदस्यत्व असलेले पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पक्ष सोडूनही आयोग शिंदेंना शिवसेनेचा सदस्य मानत आहे. या सर्व प्रक्रियेत १० वी सूची महत्वाची ठरते. मनिंदर सिंग यांच्या युक्तीवादावर सिब्बल यांनी प्रत्यूत्तर दिले होते. तसेच निवडणूक आयोग फूट पडल्याचे कसे काय ठरवू शकते, असाही प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला होता. यावर शिंदे यांनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील सिंघवी यांनी केला. तसेच आज निर्णय झाला नाही तरी शिंदे गटाचे नुकसान नाही, असेही ते म्हणाले होते. 

गेल्या काही तासांपासून ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद सुरु आहे. शिवसेनेकडून युक्तीवाद करताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या सदस्यत्वावरच प्रश्न उपस्थित केला होता. सिब्बल यांनी शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, यावर लक्ष केंद्रीत केले होते. परंतू, खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या पारड्यात चेंडू टोलविला आहे.  

सिब्बल यांचा युक्तीवाद...उद्धव ठाकरे हे २०१८ ते २०२३ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत, असे कागदपत्र उपलब्ध आहेत. परंतू, जे एकनाथ शिंदे हे आपलीच खरी शिवसेना आहे असे सांगत आहेत, त्यांच्याकडे शिवसेनेचे साधे प्राथमिक सदस्यत्व सुद्धा नाहीय. शिंदेंनी स्वत:हून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले होते. ते निवडून आलेले नाहीत तर नामनिर्देशीत सदस्य होते, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. 

काय काय घडले...एखाद्या गटाला मान्यता नसेल तर त्यावर निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो असा सवाल ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात उपस्थित केला. तर, एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकाराने धनुष्यबाण हे चिन्ह मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेल्याचा सवाल खंडपीठाने विचारला.  १९ जुलैच्या स्थितीनुसार कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल. विलीनकरण हा एकमेव मुद्दा आहे अशी बाजू ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. त्यात अपात्रतेचा मुद्दा विधिमंडळाचा आहे. आयोगाला राजकीय पक्षाबाबत निर्णय घ्यायचा आहे असं कोर्टाने म्हटलं. 

एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार म्हणून की सदस्य म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले आहेत, धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची मागणी करत आहेत, असा सवाल न्यायालयाने विचारला. त्यावर, ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनीही तोच प्रश्न उपस्थित केला. त्यावर, एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असेही खंडपीठाने म्हटले. यावर सिब्बल यांनी शिंदे हे पक्षाचे सदस्यच नाहीत असा युक्तीवाद केला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग