Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:01 IST2025-05-19T17:00:08+5:302025-05-19T17:01:10+5:30
Shrikant Shinde News: शिवसेना खासदार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर टीका केली आहे.

Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांना प्रश्न विचारल्यावरून राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. 'राहुल गांधींना देशभक्तींपेक्षा राजकारणात अधिक रस आहे', श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
#WATCH | Mumbai: On Lok Sabha LoP Rahul Gandhi's tweet asking how many aircraft we lost, Shiv Sena MP Shrikant Shinde says, "When it is the time for war, the entire nation gets united and backs the Armed Forces. I think Rahul Gandhi is more interested in doing politics than in… pic.twitter.com/fboud8nX0k
— ANI (@ANI) May 19, 2025
राहुल गांधींनी एक्सवर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "जेव्हा युद्ध होते, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो आणि सशस्त्र दलाला पाठिंबा देतो. परंतु, मला वाटते की, काँग्रेस नेते राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात अधिक रस आहे. संपूर्ण देश एकजूट आहे आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा आहे. दुसरीकडे राहुल गांधींसारखे लोक सशस्त्र दलांचे मनोबल खच्ची करत आहेत. मला असे वाटते की, राजकारणाच्या पलिकडे जाऊन देशाबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे."
राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारले. आम्हाला सांगा की, "आपण किती विमाने गमावली आहेत. ही चूक नव्हती तर गुन्हा होता. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे", असे राहुल गांधी म्हणाले. तेव्हापासून राहुल गांधी सत्ताधारी पक्षाच्या निशाण्यावर आहेत.