देशमुख पिता-पुत्राला ईडी पाठवणार पुन्हा समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 07:37 IST2021-08-09T07:37:33+5:302021-08-09T07:37:58+5:30
ईडीने गेले दोन दिवस देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून झडती घेतली आहे. त्यानुषंगाने नव्याने समन्स पाठवले जाणार आहे.

देशमुख पिता-पुत्राला ईडी पाठवणार पुन्हा समन्स
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडी आणखी एकदा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत ते जारी केले जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
ईडीने गेले दोन दिवस देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून झडती घेतली आहे. त्यानुषंगाने नव्याने समन्स पाठवले जाणार आहे. महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीचा देशमुखांसह कुटुंबीयांच्या मागे ससेमिरा सुरू आहे. त्यांना आतापर्यंत ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश व पत्नी आरती देशमुख यांना अनुक्रमे दोन व एकवेळा चौकशीसाठी समन्स बजाविले. मात्र, तिघांनीही उपस्थित राहण्याचे टाळले आहे.