शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीचे खापर ‘मारुती’वर!

By admin | Updated: March 26, 2015 01:36 IST

साईनगरीतील आर्थिक मंदीचे खापर दक्षिणमुखी मारुती मंदिरातील जुनी मूर्ती बदलून चार वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मूर्तीवर फोडले जात आहे.

प्रमोद आहेर - शिर्डी (अहमदनगर)साईनगरीतील आर्थिक मंदीचे खापर दक्षिणमुखी मारुती मंदिरातील जुनी मूर्ती बदलून चार वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मूर्तीवर फोडले जात आहे. त्यामुळे मारुतीरायाची शिर्डीतील मूर्तीच सध्या वादविवादाचा केंद्रबिंदू ठरली असल्याचे चित्र आहे.साईबाबांच्या वास्तव्याची नोंद असलेल्या या मंदिरात पूर्वी शिर्डी व बिरेगाव या दोन गावांच्या दोन मूर्ती होत्या़ यातील एक मूर्ती हनुमानाची नसल्याचेही सांगितले जाते़ चार-पाच वर्षांपूर्वी संस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार केला. तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून आणलेली काळ्या पाषाणातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मारुतीच्या मूर्तीला शेंदूरच पाहिजे, काळी मूर्ती बसवल्याने गावचे गावपण हरवले, संकटे येत आहेत. आर्थिक मंदी आली आहे, असा दावा करत संस्थान वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या जुन्या मूर्ती पुन्हा बसवाव्यात यासाठी माजी सरपंच रावसाहेब गोंदकर यांनी सध्या मोहीम उघडली आहे़ ही मूर्ती दक्षिणाभिमुखी असली तरी प्रत्यक्षात मूर्तीचा चेहरा आग्नेय दिशेला आहे. हातात द्रोणागिरी पर्वत उचललेल्या या मूर्तीचा आशीर्वाद देणारा हातही व्यस्त आहे, असे आक्षेपही घेतले जात आहेत़ हनुमान जयंतीपर्यंत त्यावर काहीतरी निर्णय अपेक्षित आहे़काळ्या पाषाणातील मूर्तीत जास्त ऊर्जा असते़ मात्र तिचे पावित्र्य न राखल्यास त्रास होतो़ मूर्तीला शेंदूर लावल्यास ती सौम्य होईल़- मोहनबुवा रामदासी, कार्यवाह, रामदास स्वामी संस्थान, सज्जनगडशेंदूरविरहीत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळीच आपण शंका उपस्थित केली होती़ जुन्या मूर्ती भंगलेल्या नव्हत्या, याचमुळे आपण त्या विसर्जित न करता वस्तुसंग्रहालयात ठेवण्याचा सल्ला दिला होता़ आता या मूर्तीला शेंदूर लावला तर ती सौम्य होईल़- अनंतशास्त्री लावर, वेदाचार्यमूर्तीची नजर आग्नेय दिशेकडे असल्याने ती दक्षिणमुखी नाही़ शास्त्रापेक्षाही परंपरेला महत्त्व असते, त्यामुळे पूर्वीप्रमाणे दोन मूर्ती आवश्यक आहेत़ - वैभव रत्नपारखी, ग्रामाचार्य