शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मानवी अवयवांचे अनोखो म्युझियम

By admin | Updated: October 11, 2016 18:58 IST

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शरीररचनेचा समावेश असतो. परंतु अनेकदा हा अभ्यास केवळ पुस्तकापुरताच मर्यादित राहतो. हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि.11 - शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शरीररचनेचा समावेश असतो. परंतु अनेकदा हा अभ्यास केवळ पुस्तकापुरताच मर्यादित राहतो.  हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे मानवी अवयवांचे अनोखो म्युझियम साकारण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मेंदू, हृदय, किडनी ,फुफ्फुस यासह शरीरातील विविध अवयव प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळत आहे.घाटी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागात हे अनोखे म्युझिमय साकारण्यात आले आहे.  शरीरातील मेंदू, हृदय, किडनी, फुफ्फुस प्रत्यक्षात कसे दिसतात, असा प्रश्न अनेकदा विद्यार्थ्यांना पडतो. केवळ पुस्तकातील चित्र स्वरुप पाहून त्याची रचना समजून घेण्याची वेळ येते. अनेकदा त्यातून विद्यार्थ्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. मात्र मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या म्युझियमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळतात. शरीरातील मेंदूपासून तर पायापर्यंतचे विविध अवयव या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहता येत आहेत. या ठिकाणी शरीरातील अवयवांचे केवळ दर्शनच होत नाही, तर येथील तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करतात. विविध अवयवांचे कार्य कसे चालते, त्यांची रचना कशी आहे, हे समजून सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शैक्षणिक आणि भावी आयुष्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारी हे म्युझिमय पाहता येणार आहे. त्यासाठी पूर्व कल्पना द्यावी लागेल. तसेच विद्यार्थ्यांसोबत शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे.

अवयवदानाचा प्रसार व्हावाम्युझियमच्या माध्यमातून शरीरातील प्रत्येक अवयवाची माहिती विद्यार्थ्यांना घेता येत आहे. एकदा ही माहिती घेतल्यानंतर विद्यार्थी ती कधीही विसरणार नाहीत. त्याचा त्यांना शैक्षणिक दृष्ट्या फायदा होईल. समाजात अवयवदानाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे, यासाठीही प्रयत्न केला जात आहे.-डॉ. शिवाजी सुक्रे, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी रुग्णालय