शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात धावणार ई-रिक्षा!

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

वाढत्या प्रदूषणावर एकमात्र पर्याय.

राम देशपांडे / अकोलाप्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचत, या उद्देशाने पुण्यातील एका खासगी कंपनीने निर्माण केलेल्या ई-रिक्षा लवकरच अकोल्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच नव्हे, तर माल वाहतुकीसाठीदेखील ई-रिक्षाचा वापर करता यावा, यासाठी निर्मात्या कंपनीने जवळपास ७५ प्रकारचे मॉडेल्स विकसित केले आहेत.वाहतुकीची समस्या अकोला शहराच्या पाचवीला पुजली आहे. पूर्वीच्या तुलनेत लोकसंख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढली असून, रस्ते व गल्लीबोळांमध्ये प्रदूषण फैलविणार्‍या वाहनांमुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वाहनांमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणाचा तुम्ही, आम्ही सर्वजण दररोज प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. शाळेत जाणारी बालकेदेखील नकळतपणे याचा सामना करीत असतात. नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहिल्यास इंधनाच्या दरवाढीमुळे प्रत्येकाचा जीव मेटाकुटीस आला आहे. या सर्व बाबींवर तोडगा काढीत पुण्यातील एका वाहन निर्मिती करणार्‍या कंपनीने शाळेत जाणार्‍या मुलांसाठी ऑटो, चाकरमान्यांसाठी फोरसिटर कार, प्रवासी व माल वाहतूक सहजरीत्या करता यावी, यासाठी ४५0 ते १ टन वजनाच्या ई-रिक्षा केल्या आहेत. ताशी ३0 कि.मी. धावणार्‍या गाड्यांसाठी आरटीओचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, ई-रिक्षेची गती ताशी २५ ते ३0 कि.मी. असल्याने त्यास आरटीओची परवानगी किंवा लायसन बाळगण्याची गरज नसल्याने इंधन बचतीचा व प्रदूषण मुक्तीचा संदेश देणार्‍या या ई-रिक्षाचा वापर देशातील सात राज्ये करीत असून, मुंबई, पुणे व शेगावात त्या केव्हाच दाखल झाल्याचे मयाणी सांगतात. त्यांनी शाळकरी मुलांची ने-आण करणारी ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर अकोल्यात आणली असून, शालेय मुलांची वाहतूक करणार्‍या ऑटो चालकांसाठी ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. लवकरच अकोल्यात देखील ई-रिक्षा धावणार, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.ई-रिक्षाची वैशिष्ट्ये.१) शहरात प्रवासी वाहतूक करणार्‍या इतर वाहनांच्या तुलनेत ई-रिक्षाची किंमत कमी.२) पूर्णत: भारतीय बनावटीची ही रिक्षा चार बॅटरीवर चालते.३) ६ तासात बॅटरी चार्ज केल्यानंतर १00 कि.मी. सलग धावते.५) कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नसल्याने पूर्णत: इको फ्रेडली.६) बॅटरी, चार्जर, टुलकिट, स्टेपनी, हॉर्न, लाईट आदींनी सज्ज.