शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

६० मीटरपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास बंदी

By admin | Updated: October 9, 2015 02:28 IST

यावर्षीची दुष्काळीस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात ६० मीटरपेक्षा जास्त खोलीचे बोअरवेल खोदण्यास बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शेतकरी किंवा नागरिकांवर

- दिगंबर जवादे,  गडचिरोलीयावर्षीची दुष्काळीस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात ६० मीटरपेक्षा जास्त खोलीचे बोअरवेल खोदण्यास बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शेतकरी किंवा नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.बागायती क्षेत्रात फळझाडांना वर्षभर पाणी द्यावे लागते. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील संत्राबेल्टमधील शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदले आहेत. सततच्या उपशामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. सर्वसाधारणपणे बोअरवेलची खोली ६० मीटर असते. मात्र स्पर्धेमुळे बोअरवेलची खोली २०० ते ३०० मीटरपर्यंत गेली आहे. शासनाने त्यालाच आळा घातला आहे.राज्यात यावर्षी केवळ ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ज्या तालुक्यांमध्ये पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात आहे, अशा गावांमध्ये कृषी तसेच औद्योगिक वापरासाठी खोल विहीर खोदण्यास बंदी घातली आहे. याबाबतच्या सूचना उपविभागीय अधिकारी व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून पूर्वपरवानगी मिळाल्यानंतरच ६० मीटरपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल खोदता येईल.अंमलबजावणीची अडचणनवीन विहीर खोदण्यास तसेच ६० मीटरच्या वर बोअरवेलचे खोदकाम करण्यास बंदी घातली असली तरी शेतकरी खासगी मशीनच्या साहाय्याने बोअरवेल खोदतात. त्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. परिणामी कोणी किती मीटर खोल बोअरवेल खोदले आहे, याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला मिळत नाही. हे ध्यानी घेता, शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.