शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी आजारांनी ठाणोकर त्रस्त

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

यंदा महापालिका हद्दीत मलेरिया आणि डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने ठाणोकरांनो सावधान असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे.

अजित मांडके - ठाणो
आला पावसाळा़़़ आरोग्य सांभाळा असे आवाहन जरी ठाणो महापालिकेकडून केले जात असले तरीसुद्धा यंदा महापालिका हद्दीत मलेरिया आणि डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने ठाणोकरांनो सावधान असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. मागील सहा महिन्यांत शहरात मलेरियाचे 687 तर डेंग्यूचे 23 रुग्ण आढळले आहेत. यामुळे साथरोग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी साथरोग आटोक्यात आणण्यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु तरीही मलेरिया आणि काविळ, गॅस्ट्रो, लेप्टो, टायफाइड, डेंग्यूसारखे आजार वाढत असल्याचे दिसत आहे. यंदा आरोग्य विभागामार्फत साथरोग आटोक्यात ठेवण्यासाठी 25 आरोग्य केंद्रांतून 25 डॉक्टर, 11क् परिचारिका असा चमू तयार करण्यात आला आहे. तसेच या परिचारिकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रक्ताचे नमुनेसुद्धा गोळा करण्यात येत असून, त्याची तपासणी केली जात आहे. यात मागील सहा महिन्यांत 4क्418 रक्त नमुने तपासण्यात आले असून त्यातील 687 जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये जून महिन्यात 1क् हजार 143 जणांचे रक्त नमुने तपासण्यात आले असून त्यातील 118 जणांना मलेरियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे जानेवारी ते जून या कालावधीत 79 रक्त नमुने तपासण्यात आले असून त्यातील 23 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर काविळचे केवळ चार रुग्ण तर  टायफाइडचे सहा रुग्ण आढळल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 
 
मच्छरांची पैदास वाढू नये आणि मलेरिया आणि डेंग्यूची साथ आटोक्यात राहावी यासाठी आरोग्य विभागामार्फत 95 हजार 783 गृहनिर्माण संस्थांना मराठीतून, 22क्17 हिंदीत पोस्टरद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तर टायरच्या 291 दुकानांना, 231 विकासकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 17614 घरोघरी जाऊन पोस्टर वाटण्यात आले आहेत. 1471 व्हेंट नायलॉन जाळ्या बसण्यात आल्या आहेत. याशिवाय 187 खासगी रुग्णालयांना सूचनांद्वारे रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
साथरोग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु ठाणोकरांनीसुद्धा सावधानता बाळगली आणि आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. 
- आर. टी. केंद्रे - मुख्य वैद्यकीय आरोग्य 
अधिकारी, ठामपा
 
वर्ष लेप्टो रुग्णमृत्यूस्वाइन फ्लूगॅस्ट्रोकाविळटायफाइडकॉलरा
2क्11क्2-क्क्क्61क्32क्2
2क्1222क्414क्क्क्911क्क्
2क्1324क्71क्11817क्क्
2क्14----क्क्क्क्4क्6क्क्