नाशिकमध्ये मनसे- भाजप युती संपुष्टात

By Admin | Updated: September 9, 2014 14:48 IST2014-09-09T14:33:21+5:302014-09-09T14:48:25+5:30

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटणार येणार असून भाजपा व शिवसेना एकत्र महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.

Due to the MNS-BJP alliance in Nashik | नाशिकमध्ये मनसे- भाजप युती संपुष्टात

नाशिकमध्ये मनसे- भाजप युती संपुष्टात

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ९ - नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाची युती संपुष्टात येणार असून भाजपा व शिवसेना एकत्र महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेना  महापौरपद तर भाजपा उपमहापौरपद लढवेल अशी माहिती मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- भाजपा युती अभेद्य असल्याचे दाखवण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे समजते. 
तीन वर्षापूर्वी निवडणुकीदरम्यान नाशिक महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असता भाजपने मनसेला साथ दिली होती. मात्र आता भाजपा सेनेबरोबर निवडणूक लढवणार आहे.

Web Title: Due to the MNS-BJP alliance in Nashik