शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मराठवाडा, विदर्भावर दुष्काळाचे सावट?, केंद्राचा प्राथमिक अंदाज : १७ राज्यांचे २२५ जिल्हे प्रभावित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:57 IST

यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.केंद्र सकारच्या ‘नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर अँड ड्रॉट अ‍ॅसेसमेंट सीस्टिम’ने वर्तविलेल्या या अंदाजानुसार काही महिन्यांपूर्वी ज्यांनी कृषिकर्ज माफीची घोषणा केली, त्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पंजाब या तीन राज्यांतील शेतीखालील मोठ्या क्षेत्रांचाही समावेश आहे. हा अंदाज खरा ठरला, तर आधीच अडचणीत असलेली तेथील शेतीच्या क्षेत्रावर आणखी ताण येईल. तज्ज्ञांच्या मते या राज्यांच्या सरकारांना जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी निधीची जुळवाजुळव करताना, मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच खरीप पिके हातची गेली,े तर नव्या अडचणी येतील.या यंत्रणेमार्फत दरमहा तयार केला जाणारा अहवाल दिल्लीतील ‘नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर’ (एनसीएफसी)तर्फे जाहीर केला जातो. या सेंटरचे संचालक एस. एस. रे यांनी सांगितले की, आॅगस्टअखेरच्या पाऊसपाण्यानुसार ज्यांच्या बाबतीत दुष्काळाचे पहिले संकेत दिले गेले, (ट्रिगर १) अशा जिल्ह्यांची संख्या २२५ होती. यात महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश होता.या आधी आॅगस्टमध्ये जो जुलैचा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात दुष्काळाची प्राथमिक शक्यता वर्तविलेल्या जिल्ह्यांची संख्या १०४ होती. महिनाभरात ही संख्या दुप्पट झाल्याचे दिसते.सरकारी पाऊस बरा झाला असला, तरी मध्यंतरी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने, खरिपाच्या पिकांची हानी होण्याची शक्यता आहे. आॅगस्टअखेरचा अहवाल येत्या काही दिवसांत अधिकृतपणे जाहीर होणे अपेक्षित आहे.हा अहवाल आला असला, तरी त्यात उल्लेख केलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दुष्काळ पडेलच असे नाही. याचे कारण असे की, दुष्काळ अधिकृतपणे जाहीर करण्याच्या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेतील ‘ट्रिगर १’ हा पहिला टप्पा आहे.तरीही तो महत्त्वाचा आहे. कारण हा अंदाज पावसाची तूट व मध्ये गेलेले कोरडे दिवस यावर आधारलेला आहे. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पैसेवारी करणे व एकूणच पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे हे या पुढील दोन टप्पे आहेत.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार