सलमान निर्दोष असल्याचा चालकाचा दावा

By Admin | Updated: March 31, 2015 03:58 IST2015-03-31T03:58:31+5:302015-03-31T03:58:31+5:30

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानने हात झटकल्यानंतर त्याला पुष्टी जोडणारा दावा त्याचाच चालक अशोक सिंगने सोमवारी सत्र न्यायालयात केला़ यामुळे हा खटला नाट्यमय वळणावर आला आहे.

The driver claims that Salman was innocent | सलमान निर्दोष असल्याचा चालकाचा दावा

सलमान निर्दोष असल्याचा चालकाचा दावा

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानने हात झटकल्यानंतर त्याला पुष्टी जोडणारा दावा त्याचाच चालक अशोक सिंगने सोमवारी सत्र न्यायालयात केला़ यामुळे हा खटला नाट्यमय वळणावर आला आहे.
ही घटना घडली, तेव्हा मीच गाडी चालवत होतो़ गाडीचा टायर फुटल्याने मला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही़ त्यामुळे गाडी फुटपाथवर चढली व यात चौघांना दुखापत झाली तसेच यातील एकाचा बळी गेला़ त्यावेळी सलमान माझ्या बाजुलाच बसला होता़ त्याच्या दिशेचा दरवाजा उघडत नसल्याने तो माझ्या बाजूच्या दरवाज्याने गाडी बाहेर पडला, असे सिंगने सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांना सांगितले़
महत्त्वाचे म्हणजे घटना झाल्यानंतर मी शंभर नंबरलाही फोन केला व पोलीस ठाण्यात जाऊन याची माहितीही दिली़ त्यानंतर तेथे सलमानही आला़ पण पोलीस अपघाताची तक्रार नोंदवून घेत नव्हते़ असा दावा सिंगने न्यायालयात केला़ पुढील सुनावणी १ एप्रिलला होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The driver claims that Salman was innocent