शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

ऑनलाईन शिक्षणासाठी स्वप्नालीचा संघर्ष; भरपावसात डोंगरावरील छोट्या झोपडीत करतेय अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 15:35 IST

कोरोनाच्या संकटात शाळांनीही आपली व्यवस्था बदलत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. परंतु सर्वच भागात ही ऑनलाईन सुविधेने अभ्यास करणे सोप्प आहे का? हा खरा प्रश्न आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे गेल्या ५ महिन्यापासून शाळा-कॉलेज बंद ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना करावा लागतोय संघर्षघरात नेटवर्क मिळत नसल्याने तरुणीने डोंगरावर बांधली झोपडी

सिंधुदुर्ग – देशभरात तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुळे अनेकांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आहे. अशातच कोरोनाचा सगळ्यात जास्त परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर होताना दिसत आहे. गेल्या ५ महिन्यापासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेज बंद आहेत. कोरोनाची परिस्थिती कधी बदलेल, शाळा पुन्हा कधी सुरु होतील याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही.

कोरोनाच्या संकटात शाळांनीही आपली व्यवस्था बदलत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. परंतु सर्वच भागात ही ऑनलाईन सुविधेने अभ्यास करणे सोप्प आहे का? हा खरा प्रश्न आहे. ज्याठिकाणी मोबाईललाही नेटवर्क मिळत नाही अशा भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे कठीणच आहे. त्यामुळे अशा दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र काही ठिकाणी शिकण्याची इच्छाशक्ती असली तर मार्ग निघतोच याची प्रचितीही येताना दिसते. याचेच उत्तम उदाहरण कोकणातील एका दुर्गम भागातून लोकांच्या समोर आलं आहे.

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी स्वप्नाली सुतार नेटवर्कची समस्या असतानाही ऑनलाईन शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहे. कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात इंटरनेटचा अभाव असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत होती, कॉलेजचे ऑनलाईन लेक्चरही बुडत होते. त्यामुळे स्वप्नालीने गावातील एका डोंगरावर जाऊन अभ्यास करण्याचं निश्चित केले. भरपावसात फक्त एका झोपडीच्या आडोशाला ती कॉलेजचं ऑनलाईन क्लासला हजेरी लावते.

सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे शाळा-कॉलेज्स बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षण कसं आणि कोण घेणार? हा प्रश्न आहे. ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय उपलब्ध आहे. पण तो सगळ्यांनाच सोयीस्कर नाही. कारण ज्याठिकाणी मोबाईलवर बोलायलाही रेंज मिळत नाही, तिथेच ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेट सुविधा असणे दुर्मिळच आहे. कोरोनाच्या सुरुवातीला कॉलेज बंद झाल्याने स्वप्नाली तिच्या गावी आली. त्यानंतर परिस्थिती गंभीर होत गेली. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. हे लॉकडाऊन वाढतच गेले. त्यानंतर शिक्षण ऑनलाईन सुरु करण्याची तयारी झाली. मात्र गावाकडे असल्याने घरात रेंज मिळत नव्हती. त्यामुळे डोंगरावर जाऊन नेटवर्क मिळतेय का पाहिलं. त्याठिकाणी नेटवर्क मिळालं पण त्याठिकाणी उन्हपावसाळ्यात अभ्यास कसा करायचा हा विचार मनात आला.

सुरुवातीच्या दिवसात १५-२० दिवस मी पावसात छत्री पकडून उभी राहून लेक्चर अटेंड केले. त्यानंतर घरातल्यांनीही पाठिंबा दिला. माझ्या भावांनी डोंगरावर एक छोटीशी झोपडी तयार केली. त्याच झोपडीत मी अभ्यासाला सुरुवात केली. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभ्यास करते, ९ ते १२.३० वाजेपर्यंत लेक्चर अटेंड करते. त्यानंतर १.३० ते ६ मध्ये प्रॅक्टिकल होते. साडेसहा वाजता सर्व आटपून घरी परतते. स्वप्नालीचा हा दिनक्रम रोजचा झालेला आहे.  स्वप्नालीला मदतीची गरज नाही. पण तिला मुंबई हॉस्टेलसाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. ती दिव्याला राहते आणि तिचं कॉलेज गोरेगाव येथे आहे. प्रवासामध्ये तिचे येऊन-जाऊन ५ तास जातात. हॉस्टेलची फी ५० हजार आहे. पण ती आवाक्याबाहेर असल्याने दिव्याला राहायला लागतं. यासंदर्भात स्थानिक आमदार नितेश राणेंनी तिच्या हॉस्टेलची अडचण सोडवू असं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSchoolशाळाonlineऑनलाइनEducationशिक्षण