शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात शीतल आमटे यांनी कोविड योद्धा म्हणून केलं होतं काम

By बाळकृष्ण परब | Updated: November 30, 2020 16:17 IST

Dr Sheetal Amte Suicide : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शीतल आमटे करजगी यांनीरुग्णसेवा दिली होती चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शीतल आमटे यांनी केली होती रुग्णसेवा डॉ. शीतल आमटे  यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे

मुंबई - दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शीतल आमटे करजगी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा दिली होती.''वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आनंदवनात पूर्णवेळ आरोग्याशी संबंधित काम करत होते. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यानंतर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. सरकारने लॉकडाऊन करण्यापूर्वीच आम्ही आनंदवनात खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती. जेव्हा मला कोविड योद्धा योजनेबाबत समजले तेव्हा मी या योजनेमध्ये सहभाग घेण्याचे ठरवले. त्यानंतर मी ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन या सेवेत रुजू झाले,'' अशी प्रतिक्रिया शीतल आमटे-करजगी यांनी त्यावेळी दिली होती.

दरम्यान, डॉ. शीतल आमटे  यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली होती. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्रांनी दिली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर आहेत. शीतल या ३९ वर्षांच्या होत्या. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.आनंदवन येथील घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे व वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे पोलीस ताफ्यासह दाखल झाले असून त्यांच्या घराची तपासणी सुरू केली आहे.  डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे वडील विकास आमटे, आई मंदाकिनी आमटे व भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी हेमलकसा येथे काही दिवसांपासून रहायला गेले होते. 

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेMaharashtraमहाराष्ट्र