डॉ. गौरी पालवे आत्महत्या; पती अनंत गर्जेला अटक, २७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी; मध्यरात्री आला शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:27 IST2025-11-25T08:26:32+5:302025-11-25T08:27:23+5:30
Mumbai News: डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गौरीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

डॉ. गौरी पालवे आत्महत्या; पती अनंत गर्जेला अटक, २७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी; मध्यरात्री आला शरण
मुंबई - डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गौरीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री १ वाजता अनंतने पोलिस ठाण्यात सरेंडर केले. त्याला अटक करत सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
फॉरेन्सिक टीमकडून घरात झाडाझडती
अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घरी धाव घेतली. गौरीने नेमकी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली? याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहे.