शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सभापती जाणणार डोंबिवलीच्या व्यथा!

By admin | Updated: June 29, 2016 03:06 IST

महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे.


कल्याण : महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे. आयुक्त ई. रवींद्रन डोंबिवलीतील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात येतात. मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला आहे. त्यामुळे महापौर गेले कुणीकडे?, असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. परंतु, आता जुलैपासून स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी स्थायीच्या बैठकीच्या दिवशी दुपारी या कार्यालयात बसण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालयांतर्गत ग, फ, ह आणि ई प्रभाग आहेत. डोंबिवलीसाठी पूर्णवेळ उपायुक्त नेमावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु, आजतागायत ती पूर्ण झालेली नाही. २०१०च्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पूर्णवेळ उपायुक्त नेमण्याची घोषणा तत्कालीन
आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केली होती.
मात्र २०१५ निवडणूक होऊनही याची अंमलबजावणी झालेली नाही. जे उपायुक्त नेमले जातात, ते डोंबिवलीला फिरकतही नाहीत. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी कल्याणला महापालिकेचे मुख्यालय गाठावे लागते. त्यामुळे आयुक्त रवींद्रन दरमहिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोंबिवली कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतात. परंतु, त्या दिवशी महासभा अथवा अन्य काही महत्त्वाचे काम आल्यास तेही डोंबिवलीत येत नाहीत.
महापौरपदी निवडून आल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवली दौऱ्यात महिन्यातून एक दिवस डोंबिवलीत येऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या अगोदर महापौर कल्याणी पाटील यांनीही असा दावा केला होता. परंतु, कालांतराने त्यांनी त्याचा विसर पडला. तोच कित्ता देवळेकर गिरवत आहेत. (प्रतिनिधी)
>दुपारी ३ च्या सुमारास भेटणार
डोंबिवलीला कोणी वाली नसल्याने आता गायकर येथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. स्थायी समितीची बैठक ते सकाळी ११ वाजता घेणार आहेत. ती आटपून दुपारी ३ च्या सुमारास ते डोंबिवली विभागीय कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, एकंदरीत यापूर्वीचा अनुभव पाहता अन्य पदाधिकाऱ्यांप्रमाणेच त्यांनीही केलेला दावा कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील समस्या गंभीर : पदाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी शहराला दाखविलेली पाठ पाहता येथील अधिकारी आणि बेफीकीर झाले आहेत. यात फेरीवाला, अतिक्रमण, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहेत. शहर स्वच्छतेचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.