शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खचू नका, शाखा लोकांना खुल्या करा; मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:12 IST

मनसेची शाखा, कार्यालये पुन्हा लोकांसाठी खुली करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी बुधवारी पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिल्या...

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे हतोत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. निकालांमुळे खचून जाऊ नका. मनातली खंत बाजूला ठेवा. जे घडले ते विसरून नव्या बदलांसह पुढे जायला हवे. महागाईने होरपळलेल्यांना दिलासा द्यायला हवा. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. मनसेची शाखा, कार्यालये पुन्हा लोकांसाठी खुली करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी बुधवारी पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिल्या.

पक्ष कार्यालयात महिलांसाठी संपर्क कक्ष- राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे निवारण करण्यासाठी पक्ष कार्यालयात महिलांसाठी संपर्क कक्ष सुरू करा, अशी सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी केली.  - अन्याय, अत्याचारग्रस्त महिलांच्या तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यांत नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा, असे आवाहन त्यांनी केले. - पोलिसांकडे काही घडले नाही तर अत्याचारी नराधमाला फोडून काढा, असे राज ठाकरे यांनी पक्षकार्यकर्त्यांना सांगितले. 

मराठी माणूस मुंबईत असुरक्षित!मतदानावेळी मतदार पक्षाकडे पाठ फिरवतात. तरी मराठी लोकांवर अत्याचार होत असताना सर्वांत आधी आपणच धावले पाहिजे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आपण हे करीत नाही. शतकातील पावशतक संपायला आले तरी अनेक गोष्टी तशाच आहेत. मुंबईत मराठी माणसाला असुरक्षित वाटत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

शेतकरी, कष्टकरी यांचे आयुष्य महागाईने होरपळून निघाले आहे. निकालानंतर काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPoliticsराजकारण