पावसाच्या महापुराचा महाडमधील १५० प्राण्यांना फटका; डोंबिवलीकर प्राणिमात्रांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:24 AM2021-07-27T10:24:17+5:302021-07-27T10:27:40+5:30

येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

dombivlikar help to rescue 150 animals in mahad after heavy rain | पावसाच्या महापुराचा महाडमधील १५० प्राण्यांना फटका; डोंबिवलीकर प्राणिमात्रांची मदत

पावसाच्या महापुराचा महाडमधील १५० प्राण्यांना फटका; डोंबिवलीकर प्राणिमात्रांची मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

डोंबिवली:कोकणातील चिपळूण, महाड पुरामध्ये माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्याचीही वाताहात झाली, त्यातही अनेक प्राण्यांचं निधन झाल्याचे निदर्शनास येत आहे. महाडधील पुराचे पाणी आता ओसरु लागले आहे. येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात बहुतांश प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण असण्याची शक्यता असते पॉझ म्हणजेच प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनीही त्यांच्या संस्थेचे पथक मदत करण्यासाठी सज्ज ठेवून आतापर्यंत १५० प्राण्यांना त्यांनी मदतकार्य केले. 

महाड, पाली, लोनेरे, माणगाव आणि इतर शहरातील संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था महाडमध्ये सध्या औषधांचा साठा पुरवत आहेत. विशेषतः प्राण्यांसाठी औषधं, साहित्याचा साठा पाठवला जातोय अस ते म्हणाले. मुंबई, डोंबिवली तसंच कल्याण परिसरातील प्राणी मित्रांकडून मदत मिळवली जात आहेत. यात ३०० किलो डॉग फूड, ५० किलो कॅट फूड, घोड्यांचे खाद्य तारपेलिन शिट्स, प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य म्हणजेच डेटॉल, अडीच किलो हळद, बेटादिन, कॉटन, सलाईन आणि इतर लागणारी औषधे जमा करून गेल्या आठवड्यापासून पाठवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. 

सोमवारी, बाकी संस्थेकडून पुन्हा एकदा साहित्य आणि औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. तसेच, पॉज संस्थेनेहिंदू दुसऱ्यांदा औषधांचा साठा पुरवला आहे. तर, गुरुवारी पुन्हा एकदा औषधांचा साठा महाडमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती भणगे यांनी दिली . डोंबिवलीतील पॉझ संस्थेचे कार्यकर्ते महाड या ठिकाणी मदतकार्य करत आहेत. आजारी प्राण्यांना औषधोपचार देत आहे. प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी वेगवेगळ्या भागात शिबीरं लावण्यात आले आहेत. 

लसीकरणावर भर 

ह्या काळात भटक्या प्राण्यांच्या मुळे कोणतीही रोगराई पसरू नये म्हणून ह्या वेळी पॉज तर्फ़े सेवन इन वन चे लसीकरण करण्यात आले असून पहिल्या दिवशी १५० भटक्या कुत्र्यांना लस दिली गेली आहे आणि ठिक ठिकाणी रेबीज लसीकरण करण्यात आल्याचे संस्थेचे टीम सदस्य प्रशांत बुन्नावार ह्यांनी सांगितले. 

२००४ च्या सुनामी पासून ते नेपाळ मधील भूकंप, कुर्ग येथील पूर ते आता महाड मधील पूर , जेव्हा नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती असेल तेव्हा तेव्हा पॉज संस्थे तर्फे आपत्ती निवारण केले जाते असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी सांगितले. 
 

Web Title: dombivlikar help to rescue 150 animals in mahad after heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.