शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

ऊठसूठ आंदोलनं करू नका !

By admin | Updated: September 10, 2014 03:01 IST

केंद्रात मोठ्या कष्टाने आपले सरकार आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा

मुंबई : केंद्रात मोठ्या कष्टाने आपले सरकार आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा. परंतु पहिल्या दिवसापासून आंदोलन करून वातावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या. तर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये दलाली खाऊन बेसुमार नफा कमावणाऱ्या दलालांवर कारवाई करणारा कायदा करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली.कांद्याचे दर कमी झाल्याने निर्यात अनुदान द्यावे तसेच आयात थांबवावी या मागणीकरिता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले आहे. याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सारखी सारखी आंदोलन करणे योग्य नाही. आपण आज केंद्रात सत्तेत असून उद्या राज्यातही सत्तेत येऊ. परंतु चर्चेने प्रश्न सोडवले पाहिजेत. ते जर सुटले नाहीत तर आंदोलन करा. केंद्रातील मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळात अनेक गोष्टींचा पाया रचला गेला आहे. सरकार म्हणजे काही अर्ध्या तासाच पिझ्झाची डिलीव्हरी नाही, असेही ते म्हणाले.दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे जळगावच्या दौऱ्यावर होते. तेथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. सरकार या नात्याने आम्हाला जसे शेतकऱ्यांचे हित पाहायचे आहे तसेच ग्राहकांचे हित देखील पाहणे गरजेचे आहे, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्यांना सांगितले. शेतकरी व व्यापारी यांच्यातील दलाल बेसुमार नफा कमावत असून त्याला पायबंद घालणाऱ्या तरतुदी कायद्यात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.