शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्केटिंग’मध्ये कमी पडू नका!

By admin | Updated: July 28, 2014 03:59 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘मार्केटिंग’ केले. त्याचा फायदा त्यांना झाला. आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाची गंगा आणली

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘मार्केटिंग’ केले. त्याचा फायदा त्यांना झाला. आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाची गंगा आणली. ही कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सरकारच्या कामाचे ‘मार्केटिंग’ करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला जागावाटपाचा तिढा हा नवी दिल्लीतच सुटेल, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्याप्रमाणे नागपूर व विदर्भात राष्ट्रवादीला ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. परंतु आत्ताच काही दावा करीत नाही कारण जागावाटपाचा निर्णय हा नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठी करतील, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे ते म्हणाले. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकमेकांच्या सहकार्याने यश मिळाले. परंतु काँग्रेसचे काही नेते चुकीचे दावे करताहेत. आम्ही पण तसेच दावे करावे का, या शब्दांत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना चिमटा काढला. पदे मिळत नाहीत अशी विदर्भातील कार्यकर्त्यांची नेहमी तक्रार असते. आम्ही पदे देऊ, चिंता करू नका, फक्त अधिकृत उमेदवाराचा एकजुटीने व जोमाने प्रचार करा. झाले गेले विसरून जा, नव्या निर्धाराने कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ काम करून भागत नाही, त्याचे प्रभावी ‘मार्केंिटंग’देखील हवे असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरेंची बाजू उचलून धरली.