जागावाटपावरून वाद घालू नका

By Admin | Updated: August 20, 2014 01:37 IST2014-08-20T01:37:15+5:302014-08-20T01:37:15+5:30

जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपातील वादामुळे महायुतीतील अन्य पक्षांचे जागावाटप रखडले आहे.

Do not argue over the seat | जागावाटपावरून वाद घालू नका

जागावाटपावरून वाद घालू नका

 रामदास आठवले : शिवसेना-भाजपाला चिमटा

मुंबई : जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपातील वादामुळे महायुतीतील अन्य पक्षांचे जागावाटप रखडले आहे. या पक्षांनी जास्त वाद न घालता  जागावाटप करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी आज केली. 
रंगशारदा सभागृहात रिपाइंच्या मुंबई विभागीय कार्यकत्र्याच्या मेळाव्यात बोलत होते. आठवले म्हणाले की, रिपाइंला जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळायला हवा. रिपाइंने मागितलेल्या 5 जागा मिळायलाच हव्यात. आमची मते शिवसेना-भाजपाला मिळतात. पण आमच्या उमेदवाराला त्यांची मते मिळत नाहीत. मात्र, ही परिस्थिती बदलायला हवी, असेही आठवले म्हणाले.
रिपाइंचे उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना अथवा भाजपाच्या चिन्हांवर लढणार नाहीत, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणो, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, विवेक पवार, सुमंत गायकवाड, दीपक निकाळजे यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
विविध वक्त्यांनी आठवलेंना मंत्निपद मिळावे, अशी मागणी केली.  प्रत्येक वक्त्याच्या भाषणात मंत्रिपदाची मागणी येऊ लागल्याने मंत्निपदासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला नसल्याचे आठवलेंना जाहीर करावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not argue over the seat