शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘बामू’ विद्यापीठात डी.लिट.ची प्रक्रिया ‘डीलीट’!

By admin | Updated: July 22, 2014 01:35 IST

(डी.लिट.) सन्मानित करण्यासाठी एकही कर्तृत्ववान व्यक्ती सापडत नसावी. त्यामुळे पाच वर्षापासून विद्यापीठाने एकालाही ‘डी.लिट.’ पदवी दिलेली नाही, हे विशेष!

विजय सरवदे - औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला (बामू) केवळ मराठवाडय़ातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात मानद डॉक्टरेट पदवीने (डी.लिट.) सन्मानित करण्यासाठी एकही कर्तृत्ववान व्यक्ती सापडत नसावी. त्यामुळे पाच वर्षापासून विद्यापीठाने एकालाही ‘डी.लिट.’ पदवी दिलेली नाही, हे विशेष!
विद्यापीठाने 197क्पासून राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी आदी क्षेत्रंत उल्लेखनीय कामगिरी करणा:या व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्रथा अवलंबिली. ‘डी.लिट.’ देण्याची ही परंपरा 2क्1क्र्पयत चालली; पण अलीकडच्या सलग चार वर्षात विद्यापीठाला राज्यात कुठेही कर्तृत्ववान व्यक्ती सापडली नसावी अथवा अधिसभा (सिनेट) सदस्यांना या पदवीचा विसर पडलेला असावा, असे दिसते.
विद्यापीठामार्फत दिली जाणारी डी.लिट. ही मानद पदवी आहे. ती कर्तृत्ववान व्यक्तीला त्याच्या विशिष्ट समारंभाच्या निमित्ताने देण्याचा प्रघात आहे. 
मी बीसीयूडीचा पदभार घेतल्यापासून यासंबंधीचा एकही प्रस्ताव आलेला नाही़, अशी माहिती  महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. सुरेशचंद्र झांबरे यांनी दिली.
 
कशी दिली जाते डी.लिट.
एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीला डी.लिट. पदवी द्यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीसमोर चर्चेसाठी ठेवला जातो. त्यानंतर तो राज्यपालांच्या मान्यतेस पाठविला जातो. मान्यता मिळाल्यावर संबंधित व्यक्तीला सन्मानाने विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलावले जाते. या समारंभात त्याला ‘डी.लिट.’ पदवी देऊन त्याचा व त्याच्या कार्याचा सन्मान केला जातो. तर दुसरीकडे 2क्क्3मध्ये राज्यपाल कार्यालयात महाकवी वामनदादा कर्डक, स.मा. गर्गे व विजय भटकर यांचा प्रस्ताव पडून आहे. 
 
आतार्पयत कोणाला मिळाली डी.लिट.
विद्यापीठाने पहिली ‘डी.लिट.’ ही संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, के.एन. सेठना, व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, मामासाहेब जगदाळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनईवादक बिस्मिल्ला खान, अण्णासाहेब गुंजकर, माधवराव बागल, देवीसिंह चौहान, सेतू माधवराव पगडी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, डॉ़ एन.डी. पाटील, बाबा आमटे, बद्रीनारायण बारवाले व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना डी.लिट.ने सन्मानित केले आहे.