लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:14 IST2025-10-11T06:14:09+5:302025-10-11T06:14:30+5:30

Ladki Bahin Yojana : अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होते.

'Diwali gift' to Ladki Bahin Yojana Money; September installment directly deposited into account | लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे. 

 अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे.

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.

Web Title : दिवाली का तोहफा: 'लाडली बहन' योजना की सितंबर किस्त जमा।

Web Summary : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना के तहत, सितंबर का मानदेय सीधे खातों में जमा किया गया। बाढ़ की चिंताओं के बावजूद, सरकार ने ₹410 करोड़ आवंटित किए। मंत्री अदिति तटकरे ने ई-केवाईसी पूरा करने का आग्रह किया; 1 करोड़ महिलाओं ने अनुपालन किया। यहां तक कि बिना केवाईसी वालों को भी यह किस्त मिली।

Web Title : Diwali Gift: September Installment of 'Beloved Sister' Scheme Deposited.

Web Summary : Under 'Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna', September's honorarium has been directly deposited into accounts. Despite flood concerns, the government allocated ₹410 crore. Minister Aditi Tatkare urged e-KYC completion; 1 crore women complied. Even those without KYC received this installment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.