शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मोदींकडून विकासाच्या मुद्याला बगल : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:03 IST

पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.

ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रचारात कुटुंबावर टिकागुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी विकासाच्या मुद्यांवर बोलत होते.मात्र,आता देशासह महाराष्ट्रात निवडणूक काळात घेतल्या जात असलेल्या प्रचारसभांमध्ये गांधी आणि पवार कुटुंबावर बोलत आहेत.पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.गेल्या पाच वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या मुद्याला बगल दिली जात आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली.शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पवार बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षप्रदिप कंद,काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून बेरोजगारी,महागाई,जीएसटी शेतक-यांचे प्रश्न याबाबत अनेक आश्वासने देण्यात आली होती. वाढलेली महागाई शंभर दिवसात कमी होईल,असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले होते.परंतु,गॅस सिलेंडर, पेट्रोलचे दर वाढलेले असून नागरिकांना जीएसटी त्रास होत आहे. नोटबंदीनंतर सर्व व्यवहार ऑनलाइन होतील, असे भाजपकडून सांगितले जात होते. परंतु,सध्या कुठेही ऑनलाइन व्यवहार होताना दिसत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते या मुद्यांवर भाष्य करत नाही.परंतु,सत्ताधा-यांनी या पूर्वी दिलेल्या आश्वानाबाबत मतदार जागृत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा झाली. सभेच्या तंत्रात ठाकरे यांनी बदल केला असून राजकीय नेत्यांनी केलेली पूर्वीची आणि नंतरची वक्तव्य मोठ्या स्किनवर दाखविली जात आहेत. ठाकरे यांनी केलेली टिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलीच लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांना ठाकरे यांच्या सभेवर भाष्य करावे लागले.-------------खेड तालुक्यात विमानतळ होऊ शकले नाही.त्यामुळे हजारो बेरोजगारांचा रोजगार गेला.पुणे -नाशिक महामागार्चे काम पूर्ण होऊ शकले नाही.पुणे- अहमदनगर महामार्गावर एकही ट्रोमा सेंटर सुरू झाले नाही,अशी अनेक विकास कामे शिरूर लोकसभा मतदार संघात अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जनतेनेचे ही निवडणूक हातात घेतली आहे.-डॉ.अमोल कोल्हे, उमेदवार, शिरूर लोकसभा  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक