शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणीसाठी जिल्हा समित्या नेमा -हायकोर्ट

By admin | Updated: January 18, 2015 01:01 IST

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणीस सध्या विबागीय पातळीवर समित्या आहेत.

मुंबई : सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह जातीच्या दाखल्यांची पडतळणी करण्याची गरज असलेल्या सर्वच संबंधितांना लवकर न्याय मिळावा व बनावट दाखल्यांच्या आधारे नोकरी अथवा शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी सरकारने जिल्हा पातळीवर जात पडताळणी समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणीस सध्या विबागीय पातळीवर समित्या आहेत. परंतु या विभागीय समित्यांकडे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत व त्यांवर निर्णय होण्यास अनेक वर्षे लागतात. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आत्मचिंतन करावे आणि जात पडताळणीसाठी जिल्हा पातळीवर समित्या स्थापन कराव्यात, असे न्यायालयाने म्हटले.रुचिरा मनोज बेंडे (पूर्वाश्रमीच्या कु. मीना रामचंद्र सोनकुसरे) यांनी केलेली याचिका मंजूर करताना दिलेल्या निकालात न्या. नरेश पाटील व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.रुचिरा बेंडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेत नोकरीस लागताना ‘हळबा-कोष्टी’ या अनुसूचित जमातीचा जन्मदाखला दिला होता. पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण नागपूर येथील जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. २००८ पासून मागणी करूनही बेंडे यांनी वैधता दाखला दिला नाही म्हणून जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना बडतर्फ केले होते. खंडपीठाने ही बडतर्फी रद्द केली व बेंडे यांच्या पडताळणी अर्जावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला. (विशेष प्रतिनिधी)बडतर्फीचा अधिकार नाहीकोणाच्याही जातीच्या दाखल्याची पडताळणी करून वैधता दाखला देण्याचा अधिकार कायद्याने फक्त जात पडताळणी समितीलाच आहे. बनावट जात दाखल्याच्या आधारे नोकरीसह इतर लाभ रद्द करण्याची कायद्यात तरतूद असली तरी ही कारवाई जातीचा दाखला समितीने अवैध ठरवून रद्द केल्यानंतर करता येते. त्यामुळे तसा निर्णय होण्यापूर्वी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पडताळणी न झाल्याने मुळात दाखला वैध नाही, असे गृहीत धरून कर्मचाऱ्यास बडतर्फ करू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.या सुनावणीत समितीच्या वकिलाने, ४,५०० हजार प्रकरणे प्रलंबित असल्याने या प्रकरणाच्या निकालास दीड वर्ष लागू शकेल, असे सांगितले. ते लक्षात घेऊन न्यायालयाने वरील निर्देश दिले. अर्जदार बेंडे यांच्यासाठी अ‍ॅड. आर. के. मेंदाडकर यांनी, जिल्हा परिषदेसाठी अ‍ॅड. सी. पी. यादव यांनी तर समितीसाठी अ‍ॅड. शंकर थोरात यांनी काम पाहिले.