शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा योजनेच्या सर्व समित्या बरखास्त करणार

By admin | Updated: July 23, 2015 01:31 IST

राज्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या बरखास्त करण्यात येतील, तसेच राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबतचा अभ्यास

मुंबई : राज्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या बरखास्त करण्यात येतील, तसेच राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबतचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक समिती नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित पेयजल योजनांच्या कामाबाबतचा आमदार किशोर पाटील, संजय सावकारे, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव देशमुख, गुलाबराव पाटील, मधुकर चव्हाण, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. फडणवीस म्हणाले की पाणीपुरवठा योजनांमध्ये ग्राम समित्यांना अधिकार दिल्याने याबाबत अनेक त्रुटी दिसून येत आहेत. पाणीपुरवठा योजनेत लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांच्या सर्व समित्या बरखास्त करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच या योजनेंतर्गत नवीन समिती स्थापन करीत असताना धोरणात्मक सूचनांचा विचार करून आवश्यक ते फेरबदल करण्यात येईल. याशिवाय पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहावी यासाठी या समितीत तांत्रिक अभियंत्याला सामावून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना सांगितले. केंद्रामार्फत नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला नव्या योजना हाती घेण्यापूर्वी जुन्या योजना पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले आहेत. तसेच नवीन योजना घेतल्यास सदर योजना सन २०१७ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कळविले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी राज्य शासनामार्फत सकारात्मक पावले उचलली जातील, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.