Disha Salian Case: दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:28 IST2025-03-20T09:21:55+5:302025-03-20T09:28:20+5:30
Disha Salian-Aditya Thackeray News: दिशा सालियान हिच्या मृत्यूला आता पाच वर्षे झाली आहेत. तिच्या घरात पार्टी सुरु होती. यावेळी तीने बाल्कनीतून उडी टाकून आत्महत्या केली होती. वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत सालियान यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Disha Salian Case: दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी
Disha Salian Death Case: आत्महत्या करून आयुष्य संपविणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. दिशाच्या मृत्यूमागेआदित्य ठाकरेंचा हात असल्याच्या राजकीय आरोपांमध्ये आता दिशाच्या वडिलांनी एन्ट्री केली आहे. सुरुवातीला आपल्याला काही तक्रार नाही असे म्हणणारे सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिक दाखल करून दिशावर सामुहिक बलात्कार झाला, या प्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशी करावी तसेच आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिशा सालियान हिच्या मृत्यूला आता पाच वर्षे झाली आहेत. तिच्या घरात पार्टी सुरु होती. यावेळी तीने बाल्कनीतून उडी टाकून आत्महत्या केली होती. वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत सालियान यांनी ही याचिका दाखल केली आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार दिशा सालियान हिचा १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. परंतू तिच्या शरिरावर कुठेही फ्रॅक्चर नव्हते. फोटोग्राफिक पुराव्यांनुसार हे सिद्ध होतेय ती अधिकृत पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. आरोपीला वाचविण्यासाठी तेव्हा राजकीय दबाव टाकला गेला होता. दिशाच्या घरी एक छोटी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला तिच्या मित्रांसह आदित्य ठाकरे, त्यांचे बॉडीगार्ड तसेच सुरज पांचोली, डिनो मारियो सहभागी झाले होते. तिच्यावर तेव्हा सामुहिक बलात्कार झाला होता, असा दावा सतीश सालियान यांनी याचिकेत केला आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार दिशा तिच्या बॉयफ्रेंड आणि काही मित्रांसोबत पार्टी करत होती. यावेळी तिचा वाद झाला आणि ती तिच्या खोलीत गेली. तिने आतून दरवाजा लॉक केला होता. दिशाच्या बॉयफ्रेंडला रोहनला इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने ती खाली पडल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते. तर दिशाच्या आई वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे आणि त्यांच्या मुलीची हत्या झालेली नाही, असे म्हटले होते. नितेश राणे यांनी या प्रकरणाचे पेनड्राईव्ह विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे सोपविले होते. याचे पुढे काहीच झालेले नाही. परंतू, आता याचिका दाखल झाल्याने पाच वर्षांपासून दबलेले प्रकरण पुन्हा बाहेर येण्याची शक्यता आहे.