आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 05:56 IST2022-05-05T05:55:36+5:302022-05-05T05:56:16+5:30

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती.

Discussions in the NCP about fighting the upcoming elections together as a Mahavikas Aghadi jitendra awhad sharad pawar | आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीत चर्चा

आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीत चर्चा

मुंबई : आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

बुधवारी, सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस राष्ट्रवादीचे सर्व मंंत्री, प्रमुख नेते आणि खासदार उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबत चर्चा झाली. आगामी निवडणुकांबाबत शरद पवार यांनी आढावा घेतला. तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवायची, असे पवार यांच्या सध्या सूचना असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 

Web Title: Discussions in the NCP about fighting the upcoming elections together as a Mahavikas Aghadi jitendra awhad sharad pawar