शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्तांवर हक्कभंगाचा इशारा

By admin | Updated: June 29, 2016 02:56 IST

कळवानाका येथे रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या शिवसेना शाखेचे काम बेकायदेशीरपणे सुरु आहे.


ठाणे : कळवानाका येथे रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या शिवसेना शाखेचे काम बेकायदेशीरपणे सुरु आहे. या संदर्भात आपण पुराव्यांसह तक्रार करु नही कारवाई न केल्यामुळे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपल्या विशेषाधिकाराचे हनन केल्याचा आरोप करु न त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल, विधानसभाध्यक्ष, मुख्यमंत्री, प्रधान सचिवांना पाठवलेल्या निवदेनाद्वारे दिला आहे. तर, या शाखेवर आगामी २४ तासात कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेविका मनिषा साळवी यांनी दिला आहे.
एप्रिल-मे महिन्यात ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान गोरगरिबांचा हक्काचा निवारा जमीनदोस्त करण्यात आला होता. या रु ंदीकरणात बाधीत झालेल्या अनेक दुकानदारांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. तर, ज्यांची घरे तुटली आहेत. त्यांना भाड्याच्या घरांमध्ये पाठविले आहे. एकीकडे गरीब जनतेवर अन्याय होत असतानाच दुसरीकडे मात्र कळवा नाका येथील शिवसेना शाखा मात्र पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या क्षेत्रफळावर अनधिकृतपणे उभारण्यात येत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या आशीर्वादामुळेच या शाखेचे खुलेआमपणे बांधकाम केले जात आहे. या संदर्भात मध्यंतरी आव्हाड यांनी स्वत: विचारणा केली होती. तसेच, आयुक्त जयस्वाल हे रजेवर असल्यामुळे चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना पुराव्यांसह लेखी निवदेनही दिले होते. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
सार्वभौम सभागृहाचा सदस्य असतानाही चव्हाण यांनी आपल्या विशेषाधिकारांचा भंग केला आहे. तसेच कायद्याचाही अवमान केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात आपण त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची सूचना देणार असल्याचे त्यांनी या निवदेनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
>राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनिषा साळवी यांनीदेखील या शाखेच्या बेकायदा बांधकामासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार केला असून आगामी २४ तासात या शाखेवर कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.