शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अपंग विकास महामंडळात १0 वर्षापासून एकही कर्मचारी नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:00 IST

ओबीसी महामंडळाच्या कर्मचा-यांकडे अतिरिक्त कार्यभार ११ वर्षात ४९३ लाभार्थींंना कर्जवाटप.

सुनील काकडे/वाशिम : अपंगांच्या आर्थिक उन्नतीसाठी २00१ साली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ स्थापन झाले; मात्र २00५-0६ पासून महामंडळातील जिल्हास्तरावर असलेल्या कार्यालयांमध्ये एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. ओबीसी महामंडळातील कर्मचार्‍यांवरच अपंगांच्या कल्याणाचाही भार टाकण्यात आल्याने दोन्हीही महामंडळांचे कामकाज थंडावले आहे. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने ३ डिसेंबर २00१ रोजी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार, अपंग बांधवांना पारदर्शक व तत्पर सेवा मिळणे अपेक्षित होते; मात्र प्रारंभीपासूनच मूळ उद्देशांपासून भरकटलेल्या या महामंडळाने २00५-0६ पासून सर्वच जिल्ह्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करणे बंद केल्यामुळे अपंगांना अपेक्षित मार्गदर्शन अथवा आपल्या अडचणी मांडण्याकरिता जागाच शिल्लक राहिली नाही. १0 वर्षांंपासून सर्व जिल्ह्यांमधील ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे अपंग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. हे अधिकारी दोन्ही महामंडळातील कामाला योग्य न्याय देण्यास असर्मथ ठरले असून कामाच्या, वाढत्या व्यापाने ते पार वैतागले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे दोन्ही महामंडळं अल्पावधीतच पूर्णत: बंद पडतात की काय, अशी भिती वर्तविली जात आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातील कर्जवाटपाच्या किचकट प्रक्रियेमुळे गेल्या ११ वर्षात अमरावती विभागातील केवळ ४९३ अपंग लाभार्थींंना स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य मिळाले. त्यात अमरावती जिल्ह्यातील १८९ लाभार्थींंसह बुलडाणा जिल्ह्यातील १0४, यवतमाळ १0२; तर वाशिम जिल्ह्यातील ९८ लाभार्थींंचा समावेश आहे. यासंदर्भात अमरावती येथील ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश उमक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळात सध्या एकही कार्यालयीन पद भरलेले नसल्याचे सांगीतले. यामुळे गेल्या अनेक वर्षांंपासून ही जबाबदारी ओबीसी महामंडळातील अधिकार्‍यांनाच पार पाडावी लागत आहे. अशाही स्थितीत वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये काम चांगले करुन दाखविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगीतले.

*यवतमाळच्या अधिका-याकडे वाशिमचा कारभार

यवतमाळ येथील ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक मुकेश उमक यांच्याकडे सध्या वाशिमचाही कारभार सोपविण्यात आलेला आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील ओबीसी आणि अपंग विकास महामंडळाचे कामकाज पाहताना गत कित्येक वर्षांंपासून आजारी रजादेखील मिळाली नसल्याचे दु:ख उमक यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले.