शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट बुकीवर सक्तवसुली संचालनालयाची धाड

By admin | Updated: July 15, 2015 01:14 IST

क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या उपराजधानीतील एका नामांकित बुकीचे रामदास पेठेतील निवासस्थान आणि इतवारी येथील व्यावसायिक प्रतिष्ठानावर

नागपूर : क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या उपराजधानीतील एका नामांकित बुकीचे रामदास पेठेतील निवासस्थान आणि इतवारी येथील व्यावसायिक प्रतिष्ठानावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अन्वेषण विभागाने मंगळवारी धाड टाकली. बुकीच्या दोन्ही ठिकाणांवर सकाळी १० वाजता एकाचवेळी ही कारवाई सुरू झाली. कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. धाडीची माहिती देण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. धाडीची कारवाई सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील प्रत्येकी सहा सदस्यीय दोन चमूने केली. न्या. आर.एम. लोढा कमिटीने मंगळवारी दिलेल्या निर्णयाशी संबंधित ही धाड असल्याचे बोलले जात आहे. या समितीने चेन्नई सुपर किंग (सीएसके) आणि राजस्थान रॉयल (आरआर) क्रिकेट टीमवर दोन वर्षांसाठी बंदी टाकली, शिवाय या दोन्ही चमूचे मालक गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या भारतीय प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यावर आजन्म बंदी टाकली. न्या. लोढा हे मुंबईत भरगच्च पत्रपरिषदेत समितीचा निर्णय जाहीर करीत होते तर दुसरीकडे ‘ईडी’चे अधिकारी नागपुरात धाडीची कारवाई करीत होते. नागपुरातील बुकी हा नामांकित सट्टाकिंग आहे. मुंबई, इंदूर, दिल्ली, कानपूर, कोलकाता आणि देशातील अन्य शहरातील बुकींसोबत त्याचे हितसंबंध आहेत. या बुकीने मध्य भारतात सट्ट्याच्या माध्यमातून येणारा पैसा गोळा करण्यासाठी आपले एजंट नेमले आहेत. त्याचे नेटवर्क ओडीआय, आयपीएल आणि २०-टष्ट्वेन्टी सामन्यादरम्यान सक्रिय असते. सामनेच नव्हे तर स्पॉट फिक्सिंवरही ते सट्टा खातात. या व्यवसायातील अन्य बुकींनी सांगितले की, हे एजंट छोट्या शहरातील ग्राहकांकडून खायवाडी करून नागपुरातील या बुकीकडे नोंद (उतारी) करतात. नागपुरातील बुकीला जोखीम वाटली तर तो अन्य शहरातील मोठ्या बुकींकडे येथील सट्ट्याची नोंद करतो. बुकीचा हा व्यवसाय मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले मोबाईल फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून करतात. पण पैशाची देवाणघेवाण ही नेहमीच हवालाच्या माध्यमातून करण्यात येते. सामन्याचा निर्णय येताच पैज लावणाऱ्याला त्वरित भुगतान केले जाते. या अवैध धंद्यामध्ये विश्वासार्हता येण्यासाठी प्रत्येक सौद्याचे भुगतान अतिशय प्रामाणिकपणे केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)