दिनकर साळुंके, एस. आर. वाटे यांची नावे विद्यापीठाने सुचविली

By admin | Published: November 21, 2014 12:50 AM2014-11-21T00:50:51+5:302014-11-21T00:53:52+5:30

संयुक्त बैठकीत कुलगुरू निवड प्रक्रिया

Dinkar Salunke, S.K. R. The university has suggested the names of the way | दिनकर साळुंके, एस. आर. वाटे यांची नावे विद्यापीठाने सुचविली

दिनकर साळुंके, एस. आर. वाटे यांची नावे विद्यापीठाने सुचविली

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४, कलम १२ (१) (ए) आणि (सी)मधील तरतुदीनुसार शिवाजी विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीची कुलगुरू निवड करण्याकरिता शोध समितीवर नामनिर्देशन करण्यासाठी व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांची संयुक्त बैठक आज, गुरुवारी विद्यापीठ कार्यालयात झाली. यात दिल्लीतील रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (आरसीबी)चे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर मश्नू साळुंके व नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे (नीरी) संचालक डॉ. एस. आर. वाटे यांची नावे राजभवनकडे सूचित केली आहेत.
कुलगुरू डॉ. पवार यांची मुदत २५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत आहे. मुदत संपण्याच्या सहा महिने आधी नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू व्हावी, असे संकेत आहेत. मात्र, त्याबाबत निवडणुका, आचारसंहिता, आदींमुळे हालचाली झाल्या नव्हत्या, पण डॉ. पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच आपली विद्यापीठातील मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार असल्याचे कुलपती कार्यालयाला कळविले होते. त्यावर दि. ३१ आॅक्टोबरला राजभवनातून कुलगुरू निवडीसाठीच्या समितीसाठी विद्यापीठ प्रतिनिधींचे नामनिर्देशन करा, या आदेशाचे पत्र पाठविले. त्यानुसार प्रतिनिधींचे नामनिर्देशन करण्यासाठी आज बैठक झाली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांची संयुक्त बैठक आज विद्यापीठ कार्यालयात झाली.
डॉ. साळुंके व डॉ. वाटे यांची नावे सूचित करण्यात आली. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. ए. एस. भोईटे उपस्थित होते. सचिवपदी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dinkar Salunke, S.K. R. The university has suggested the names of the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.