शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सांगली सिव्हिलमध्ये धिंगाणा, नगरसेविका पुत्रास अटक

By admin | Updated: August 18, 2016 20:58 IST

डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन त्यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या नगरसेविका पुत्रास विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली.

आनलाइन लोकमतसांगली, दि. 18 : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) वॉर्ड क्रमांक ४० मध्ये धिंगाणा घालत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन त्यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या नगरसेविका पुत्रास विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. अभिजित दत्तात्रय भोसले (वय ३२, रा. हनुमाननगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडलेली ही घटना वॉर्डाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अभिजित भोसले याच्या परिचयाचे रुग्ण सिद्राम कसाले हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६३ मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना वॉर्ड क्रमांक ४० मध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या, पण त्यांना हलविले नव्हते. त्यामुळे मंगळवारी रात्री भोसले रुग्णालयात गेला. वॉर्ड ४० मध्ये डॉ. सतीश गडदे होते. त्यांच्याशी भोसलेने हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धाऊन गेला. कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्या अंगावरही तो धाऊन गेला. कसाले यांना वॉर्ड ४० मध्ये का आणले नाही, असे तो जोरजोराने ओरडत होता. तब्बल तीन ते चारवेळा त्यास वॉर्डातून बाहेर काढले होते. पण तरीही तो पुन्हा आत जात होता. बाहेर काढल्यानंतर त्याने पायातील चप्पल डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्यादिशेने फेकून मारली होती. त्याचा हा धिंगाणा वॉर्डाबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

रुग्णालयात सातत्याने डॉक्टरांवर होत असलेल्या हल्लयाच्या घटनांचा निवासी (मार्ड) डॉक्टर संघटनेने निषेध करून अधिष्ठातांकडे तक्रार केली होती. अधिष्ठातांनी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याशी घटनेबाबत चर्चा केली. शिंदे यांनी गुन्हा दाखल करून संशयित भोसलेला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी डॉ. गडदे यांची फिर्याद घेऊन भोसलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी त्यास अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सायंकाळी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. रखवालदार कशासाठी?डॉक्टरांवर सातत्याने हल्ला होण्याच्या घटना घडल्याने रुग्णालयात खासगी रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण अशा घटनावेळी रखवालदार घाबरुन पुढे येत नाहीत. मग त्यांचा काय उपयोग? असा प्रश्न निर्माण होत आहे. महिन्याला लाखो रुपये त्यांना पगार दिला जात आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेऐवजी त्यांची रुग्णांच्या नातेवाईकांवर दादागिरी सुरू असते.