शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मधुमेह दिन विशेष : दडपणामुळे तरुणाई लपवतेय आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 02:20 IST

ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे

स्नेहा मोरे 

मुंबई : ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे लपवितात. मुंबईसारख्या मेट्रो शहरात हे प्रमाण अधिक असून, सध्या अशा प्रकारचे अनेक रुग्ण दिसून येत असल्याचे मधुमेहतज्ज्ञांनी निरीक्षण केले आहे. बऱ्याचदा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मधुमेहाचे निदान झाल्यामुळे तरुणांना सामाजिक दडपण येते. मधुमेहामुळे करिअर, लग्न, मित्रपरिवाराकडून मिळणारी वागणूक अशा अनेक समस्यांमुळे तरुणांमध्ये हा न्यूनगंड दिसून येत आहे.

मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले की, २३ ते ३० वयोगटांतील अनेक तरुण-तरुणींना टाइप-१ मधुमेहाचे निदान होते. मात्र, ते मधुमेह झाल्याचे लपवितात. अनेकदा या मुलांचे पालक फाइल घेऊन त्यांची औषधे घेण्यासाठी क्लिनिकला येतात. अंधेरीत राहणाºया २७ वर्षांच्या तरुणीवर मधुमेहाचे उपचार सुरू आहेत. ती उच्चशिक्षित असून, एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे, पण मागील दोन वर्षांपासून एकदाही ती क्लिनिकला आलेली नाही. तिची आई मात्र, नित्यनेमाने तिच्या प्रकृतीची प्रगती कळवून औषधे घेऊन जाते. तिच्याप्रमाणेच, आणखी एका २८ वर्षांच्या तरुणाला साधारण ३-४ महिन्यांपूर्वी मधुमेहाचे निदान झाले. मात्र, निदान झाल्यापासून राहत्या घराच्या परिसरातील क्लिनिकमध्ये पुन्हा येणार नाही, असे त्याने सांगितले. घर-कार्यालयापासून दूर असलेल्या दुसºया क्लिनिकमध्ये जाऊन तो उपचार घेत आहे. अशा रुग्णांच्या मनातील भीती, वाटणारी लाज घालविण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर त्यांचे समपुदेशन करतो. त्यांच्याशी संवाद साधून मधुमेह हा गंभीर आजार नाही, याचे दडपण घेऊन नका, वेळीच घर- मित्रपरिवारातील लोकांशी संवाद साधा, असा सल्लाही दिला जातो. मधुमेहाचे निदान झालेल्या तरुणाईला लग्न जुळताना समस्या येतात. कारण आजही मधुमेह हा आपल्या समाजात गंभीर आजार मानला जातो. मात्र, प्रतिबंधात्मक उपायांनी त्यावर नियंत्रण मिळविता येते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, तसेच काही तरुण-तरुणींसाठी मधुमेह हा करिअरच्या टप्प्यातील अडथळा ठरतो.समुपदेशन गरजेचेमधुमेहतज्ज्ञ डॉ. मिहीर राऊत यांनी सांगितले की, तरुणाईतील सामाजिक दडपणामागे विशिष्ट कारणे आहेत. मधुमेहाची औषधे घेताना बºयाचदा जीवनशैली आणि आहारावर बंधने येतात. सद्यस्थितीत ही बंधने पाळणे तरुणाईला शक्य नसते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचा रोजचा दिनक्रम, सवयी बदलल्या आहेत. औषधोपचार करताना अनेक पथ्य पाळावी लागतात. सर्वच रुग्ण काटेकोरपणे याचे पालन करत नाहीत. शिवाय, केवळ मधुमेहच नव्हे, तर इतरही अनके आजारांबाबत तरुणाई हे दडपण बाळगून असते. अशा स्थितीत त्यांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, ही काळाची गरज आहे. 

टॅग्स :diabetesमधुमेहMumbaiमुंबईHealthआरोग्य