शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर

By admin | Updated: August 2, 2014 02:45 IST

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करता येत नसेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे

मुंबई : ‘धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करता येत नसेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा’, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी करत धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीने शुक्रवारी भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत धडक मोर्चा काढला. गजी ढोलाच्या तालावर निघालेला मोर्चा आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर महासभेत झाले. त्या वेळी जानकर बोलत होते.जानकर म्हणाले, ‘सत्तेची खुर्ची हलवल्याशिवाय धनगर समाजाची किंमत सरकारला कळणार नाही. त्यामुळे धनगर समाजाने आपले राजकीय दल मजबूत करण्याची गरज आहे. त्याशिवाय समाजाचे भले होणे शक्य नाही. आघाडी सरकारने आदिवासी आणि धनगर समाजात भांडण लावण्याचे काम केले आहे. कारण बारामतीमधील मोर्चा पाहून सरकारचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मागणया मान्य केल्या, तर अडचण आणि नाही केल्या तर खोळंबा अशी सरकारची अवस्था झाली आहे.’ अनुसूचित जमातीत समाजाचा समावेश व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या आठ दिवसांत भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीची सत्ता आल्यावर एका महिन्याच्या आत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिले. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची नोंद महायुती तिच्या जाहीरनाम्यात करत नाही, तोपर्यंत महायुतीवरही विश्वास ठेवू नका, असे शेंडगे म्हणाले. अनुसूचित जातींच्या यादीत उल्लेख करण्यात आलेला धनगड म्हणजेच धनगर समाज आहे. राज्यात धनगड नावाची जमातच अस्तित्वात नसून अपभ्रंश झाल्याने समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे रमेश शेंडगे म्हणाले. राज्य सरकारने तत्काळ धनगर म्हणजे धनगड हे मान्य करून आरक्षण लागू करण्यासाठी मंत्रिमंडळाची एक बैठक घेऊन निर्णय घेण्याची मागणी शेंडगे यांनी केली.दरम्यान शनिवारपर्यंत कोणत्याही नेत्याविरोधात वक्तव्य न करण्याचे आवाहन समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी केले. आठ दिवसांची मुदत सरकारने मागितली असून ती शनिवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे रविवारपासून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी कोअर कमिटीची बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.शनिवारपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही, तर रविवारपासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष हनुमंत सुळ यांनी दिला. मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागून देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.लवकरच बारामतीत समितीची बैठक पार पडेल. त्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.या वेळी डॉ. विकास महात्मे, आमदार अनिल गोटे, आमदार हरिभाऊ घोडके, आमदार हरिदास भदे आणि अन्य नेते उपस्थित होते.